ETV Bharat / entertainment

बिक्की उर्फ ​​राजकुमार राव आपल्या गँगसह 'स्त्री 2'मधून धमाका करण्यासाठी सज्ज, नवीन पोस्टर रिलीज - STREE 2 Movie - STREE 2 MOVIE

Stree 2 : 'स्त्री 2' या चित्रपटामधील नवीन पोस्टर ​​राजकुमार राव यानं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्याची पूर्ण गँग सरकटेच्या समोर उभी असल्याचं दिसत आहे.

Stree 2
स्त्री 2 (ANI - photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 4:24 PM IST

मुंबई - Stree 2 : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' आणि 'स्त्री'चा सीक्वल चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दिनेश विजानचा 'स्त्री' हा 2018 मधील सर्वात लोकप्रिय हॉरर चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. दरम्यान आज 17 जुलै रोजी 'स्त्री 2' मधील आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आता या चित्रपटामधील पोस्टर राजकुमार रावनं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये राजकुमार रावनं लिहिलं, "तयार होऊन जा आता बिक्की आपल्या गँगबरोबर येत आहे. वर्षातील सर्वात मोठा हॉरर कॉमेडी चित्रपट. 'स्त्री 2'चं ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे."

'स्त्री 2'मधील नवीन पोस्टर झालं रिलीज : 'स्त्री 2' चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. 'स्त्री 2' हा चित्रपट 'स्त्री'च्या रिलीजच्या 6 वर्षानंतर येत आहे. यावेळी प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरशिवाय वरुण धवन, तमन्ना भाटिया, पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, आकाश दाभाडे आणि फ्लोरा सैनी हे कलाकार दिसणार आहेत. पहिल्या भागात स्त्रीची दहशत होती. आता दुसऱ्या भागामध्ये सरकटेचा थरार पाहायला मिळणार आहे.

अक्षय कुमार करणार 'स्त्री 2'मध्ये एंट्री : 16 जुलै 2024 रोजी, श्रद्धा कपूरनं भयानक पोस्टरसह ट्रेलर कधी रिलीज होईल याबद्दल खुलासा केला होता. पोस्टरमध्ये एक थरारक आकृती दाखवण्यात आली होती. या आकृतीच्या हातात डोके कापलेलं होतं. पोस्टरमध्ये श्रद्धा तिच्या लांब केसांची जादू दाखवताना दिसली. तसेच या पोस्टरवर 'सरकटे यांची दहशत' असं लिहिलं होतं. अक्षय कुमार या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत असणार आहे. राजकुमार विक्की पराशरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर त्याचे दोन मित्र बिट्टू आणि जाना यांची भूमिका अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे. या चित्रपटाच्या रिलीज वाट आता अनेकजण पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित - STREE 2 TRAILER
  2. रुपेरी पडद्यावर अभिषेक बॅनर्जीचे दोन चित्रपट होतील एकाच दिवशी प्रदर्शित - Stree 2 and Veda

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.