मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात त्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात जारी करण्यात आलेल्या लुकआउट परिपत्रकावरील मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. सीबीआय आणि महाराष्ट्र राज्यानं रिया आणि तिच्या कुटुंबावर लुकआउट परिपत्रक जारी केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौक चक्रवर्ती आणि वडील लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांच्याविरुद्ध जारी केलेले लुकआउट परिपत्रक फेटाळलं होतं.
रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून मिळाला दिलासा : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला फटकारताना मोठी टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी म्हटलं, "एका उच्चभ्रू व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश असल्यानं तुम्ही ही याचिका दाखल करत आहात, याची तुम्हाला नक्कीच किंमत मोजावी लागेल, त्यांची मुळे समाजात खोलवर रुजलेली आहेत, सीबीआयची इच्छा असेल तर ती काही तर्कानं युक्तिवाद करू शकतात." न्यायमूर्ती के.व्ही.विश्वनाथन यांनी या प्रकरणांमध्येही सीबीआयचं लुकआउट परिपत्रक जारी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध जारी केलेले लुकआउट परिपत्रक रद्द केलं. याप्रकरणी सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सुशांत सिंह राजपूतचं मृत्यू प्रकरण : सुशांत सिंह राजपूत चार वर्षांपूर्वी 14 जून 2020 रोजी त्याच्या फ्लॉटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. सुशांतच्या मृत्यूपूर्वी तो रिया चक्रवर्तीला डेट करत होता. या दोघांनीही परदेश दौरा केला होता. सुशांतच्या मृत्यूचं कारण आतापर्यंत समोर आलेले नाही, मात्र सर्वात मोठा संशय रिया चक्रवर्तीवर याप्रकरणी करण्यात आला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर याप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सना घेरायला सुरुवात झाली होती. त्यावेळी लॉकडाऊन होता, सोशल मीडियावर लोक बॉलिवूडवर बहिष्कार टाकला गेला पाहिजे, असे देखील म्हणत होते. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला होता. आजही सोशल मीडियावर सुशांतला न्याय मिळवा यासाठी लोक प्रशासनाला विनंती करत असतात. याशिवाय याप्रकरणी सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती न्याय मागताना अनेकदा दिसते.
हेही वाचा :