मुंबई - SSMB29: दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा 'गुंटूर कारम' हा चित्रपट अलिकडे रिलीज झाला होता. त्याच्या तमाम चाहत्यांनी यातील त्याच्या भूमिकेचं कौतुक केलं. त्याच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी त्यानं आता खूशखबर दिली आहे. त्याचा आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली करणार आहे. या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक SSMB29 असे ठरवण्यात आलं आहे. राजमौली यांनी या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. हा एक ग्लोब-ट्रोटिंग साहसी 'जंगल अॅडव्हेंचर' चित्रपट असल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटाचे प्री प्रॉडक्शनचे काम सुरू झाले असून यासाठी महेश बाबूचा लूक बाबत चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाचे लोकेशन्स सुंदर ठिकाणी होणार असून यासाठी जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्टपर्यंतचा शोध घेण्यासाठी प्रॉडक्शन टीम फिरत आहे.
एसएस राजामौली दिग्दर्शित SSMB29 च्या लेटेस्ट अपडेटनुसार महेश बाबूचे या चित्रपटात वेगवेगळे आठ लूक असणार आहेत. हे लूक स्वतः एसएस राजामौली यांनी काळजीपूर्वक क्युरेट केले आहेत आणि त्याला अंतिम केले आहे. प्रॉडक्शन टीमने या प्रोजेक्टबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चाहत्यांची याबद्दलची उत्सुकता अधिकच ताणली आहे. आरआरआर चित्रपटाला जगभर मिळालेल्या लौकिकानंतर एसएस राजामौलींचा हा पहिलाच आगामी चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्याही चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर पुरस्कारांने गौरवण्यात आले होते. यासाठी एमएम किरवणी यांच्या साउंडट्रॅकमागील संगीतातील प्रतिभा, पुन्हा एकदा महेश बाबू अभिनीत राजामौलीच्या आगामी चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला दुर्गा आर्ट्स अंतर्गत केएल नारायण यांचे पाठबळ लाभले आहे.
असे असले तरी, उत्सुक चाहत्यांना संयम बाळगण्याची आवश्यकता असू शकते कारण SSMB29 च्या निर्मितीसाठी दोन ते तीन वर्षे लागणार आहे. हेच राजमौली यांच्या सूक्ष्म चित्रपट निर्मिती प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी 'बाहुबली', 'आरआरआर' सारख्या चित्रपटाचे लेखक आणि राजामौलीचे वडील विजयेंद्र प्रसाद यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या चित्रपटात विदेशी कलाकारांसह अनेक कलाकारांचा समावेश असल्याची चर्चा आहे आणि या चित्रपटाचे अंदाजे बजेट 1 हाजार कोटींचे असेल.
हेही वाचा -