ETV Bharat / entertainment

साऊथ अभिनेत्री सौम्या जानूचा ट्रॅफिक होमगार्डवर हल्ला, रस्त्यातील राड्याचा व्हिडिओ व्हायरल - सौम्यानं होमगार्डवर केला हल्ला

Tollywood Actress sowmya Janu : साऊथ अभिनेत्री सौम्या जानूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती ट्रॅफिक होमगार्ड वाद घालताना दिसत आहे.

Tollywood Actress sowmya Janu
साऊथ अभिनेत्री सौम्या जानू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 2:53 PM IST

मुंबई - Tollywood Actress sowmya Janu : साऊथ अभिनेत्री सौम्या जानू हिच्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सौम्या जानूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सौम्या ही रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहे. यावेळी अनेक लोकांची गर्दी जमली होती, मात्र याची परवा न करता ती आणखी वाद घालत होती. हे प्रकरण हैदराबादच्या बंजारा हिल्सचे आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सौम्या जानूला ट्रॅफिक होमगार्डबरोबर भांडताना दिसत आहे. सौम्याची कार चुकीच्या बाजूने येत होती. त्यामुळे ट्रॅफिक होम गार्डनं तिची कार थांबवली, यानंतर ती वाद करू लागली.

सौम्या जानू ट्रॅफिक होमगार्डचे फाडले कपडे : व्हिडिओत सौम्या या गार्डशी जोरदार भांडताना दिसत आहे. सौम्या जानू आणि ट्रॅफिक होमगार्डमधील हा संपूर्ण वाद लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. यानंतर या व्हिडिओला अनेकांनी वेगवेगळ्या अकाउंटवरून अपलोड केले आहे. व्हिडिओत सौम्यानं होमगार्डचे कपडे फाडले आणि त्याचा फोनही हिसकावून घेतल्याचं सांगितलं जात आहे. सौम्या कार थांबविल्यामुळं ती चिडली असल्याचं समजत आहे. यावेळी ती होमगार्डशी फार उद्धटपणे बोलू लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून सौम्यावर अनेकजण संतापले असून तिच्यावर टीका करताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्यानं घेत बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात सौम्या जानूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौम्या जानूवर गुन्हा दाखल : सौम्या जानूची तक्रार नोंदवण्यासोबतच या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागला आहे. याशिवाय आता अनेकजण सौम्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. शनिवारी, 24 फेब्रुवारी रोजी रात्री 8:24 च्या सुमारास हा गोंधळ झाला असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाबद्दल सध्या तपास सुरू आहे. दरम्यान, सौम्यानं नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत त्या रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. सौम्यानं चुकीच्या मार्गानं कार चालविल्यामुळे होमगार्डला माफी मागितली. यावेळी तिनं स्पष्ट केलं की, तिच्या आईची तब्येत ठीक नसल्यानं ती औषधासाठी बाहेर गेली होती. तिनं हीच गोष्ट होमगार्डला सांगितली आणि त्यानं दुर्लक्ष करून तिचा उद्धटपणे अपमान केला. यानंतर तिचा संयम सुटला आणि तिनं वाद घातला. पुढं सौम्या जानूनं म्हटलं की, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर चूक कोणाची आहे ते कळेल. तिच्यासारख्या सेलिब्रिटीचा असा अपमान झाला तर सर्वसामान्यांची काय अवस्था होत असल्याचं तिनं म्हटलं आहे. याशिवाय ती होमगार्डवरही गुन्हा दाखल करणार असल्याचं तिनं मुलाखतीत सांगितलं आहे. 'चंदामामा कथलू', 'सिंह', 'तडाखा' यांसारख्या चित्रपटांमध्ये सौम्या जानूनं काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. 'योद्धा'च्या ट्रेलर रिलीजपूर्वी सिद्धार्थ मल्होत्राने दिला 'अभूतपूर्व थरार' असल्याचा संकेत
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधील 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज ; पाहा व्हिडिओ
  3. आमिर- किरण रावने होस्ट केले 'लापता लेडीज'चे स्क्रीनिंग; काजोल, करण, आयरा आणि नुपूरची स्टाईलमध्ये हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.