ETV Bharat / entertainment

गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर 19 हजार कोटींची कमाई, चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये साऊथ इंडियाचे प्रेक्षक आघाडीवर - Indian Box Office

Indian Box Office : 2023 मध्ये भारतीय चित्रपटांनी तुफान कमाई केली. कोरोना काळात लागलेल्या घसरणीला सावरण्यात या इंडस्ट्रीला मोठं यश मिळालं. यामध्ये वर्षाला सरासरी चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये साऊथ इंडियाचे प्रेक्षक आघाडीवर आहेत. तेलुगु 9, तमिळ 8 तर हिंदी प्रेक्षकांनी वर्षाला सरासरी ३ चित्रपट पाहिले आहेत.

Indian Box Office
बॉक्स ऑफिसवर 19 हजार कोटींची कमाई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 9:00 PM IST

मुंबई INDIAN BOX OFFICE - भारतीय रुपेरी पडद्यावरची बॉक्स ऑफिस कमाईच्या चर्चा आपण अनेकदा वाचत, ऐकत असतो. एखादा चित्रपट 100 कोटींची कमाई करतो तेव्हा प्रेक्षकांच्या भुवया उंचावतात. बॉलिवूडसह साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेल्या अनेक चित्रपटांची यादी आपल्याला धुंडाळता येईल. पण त्याहूनही एक धक्कादायक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. गेल्यावर्षी 2023 मध्ये 157 दशलक्षाहून अधिक भारतीयांनी थिएटरमध्ये किमान एक चित्रपट पाहिला आहे. 2022 मधील 122 दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत तिकीट काढून थिएटरबाहेर रांगेत उभे राहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 29 टक्क्यानं वाढली आहे.

2023 मध्ये 157 दशलक्षाहून अधिक लोकांनी तिकीटे खरेदी केली याचा अर्थ त्यांनी वर्षभरात सरासरी 6 चित्रपट पाहिले आहेत. भाषेनुसार ही संख्या आणखी बदलते. यामध्ये तेलुगु भाषिक प्रेक्षकांची संख्या खूप मोठी आहे. साऊथचा तमिळ, कन्नड, मल्याळम भाषेहून तेलुगु भाषिक प्रेक्षक सर्वाधिक आहेत. या प्रेक्षकांनी वर्षाला 9 पेक्षा जास्त चित्रपटांच्या सरासरीने चित्रपट पाहिलेत. तमिळ प्रेक्षकांनी सरासरी 8 तर पंजाबी प्रेक्षकांनी 5 चित्रपट पाहिलेत. या तुलनेत हिंदी प्रेक्षकांनी सरासरी 3 चित्रपट पाहिल्यानं ते पिछाडीवर आहेत.

या सर्वांचा विचार करता या काळात 943 दशलक्ष तिकीटांची विक्री झाली असून भारतीय फिल्म इंडस्ट्रीनं बॉक्स ऑफिसवर एकूण कमाई 19,700 कोटींची केली आहे. यामध्ये देशांतर्गत आणि परदेशी थिएटर, म्यूझिक, टीव्ही आणि ओटीटीवरील स्ट्रीमिंग अधिकारांचाही समावेश आहे.

900 दशलक्ष लोक नियमितपणे टेलिव्हिजन पाहात असल्याचाही धक्कादायक निष्कर्ष विश्लेषकांनी काढला आहे. 510 दशलक्षाहून अधिक लोक व्हिडिओ आणि चित्रपटांसाठी दररोज नेटवर शोध घेतात. पॅन इंडिया चित्रपटाच्या यशाने ( पुष्पा, जवान, पठाण, जेलर किंवा शैतान इत्यादी ) सर्व भाषांमधील सिनेमांसाठी राष्ट्रीय बाजारपेठ मोकळी झाली असून प्रेक्षकांची एकूण संख्याही वाढली आहे.

हेही वाचा..

'नाच गं घुमा' सिनेमातील स्त्री प्रत्येक घरातील स्त्रीचं प्रतिनिधित्व करते, मुक्ता बर्वेची प्रतिक्रिया - Mukta Barve

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'मधील पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ - First Single Pushpa Pushpa OUT

अमृता सुभाषचा 'फोर्ब्स इंडिया वुमन पॉवर 2024'मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मान - Forbes India Women Power 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.