मुंबई - Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियानं अंधेरी पश्चिमला, तीन फ्लॅटची व्यावसायिक मालमत्ता 18 लाख रुपये प्रति महिना भाड्यानं घेतली आहे. याबद्दलची माहिती रिअल इस्टेट डेटा नोंदणीच्या माध्यामातून समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर तमन्नानं भाड्यानं घेतलेल्या मालमत्तेबद्दल चर्चा होताना दिसत आहे. नानावटी कन्स्ट्रक्शननं जुहू तारा रोडवरील वेस्टर्न विंडमध्ये 6065 चौरस फूट व्यावसायिक जागा 5 वर्षांसाठी 18 लाख रुपये प्रति महिना भाड्यानं घेतल्याचं उघड झाल्यानं, तिचे चाहते देखील खुश आहेत. दरम्यान तमन्नानं घेतलेल्या मालमत्तेचे भाडे चौथ्या वर्षी 20.16 लाख रुपये आणि पाचव्या वर्षी 20.96 लाख रुपये होणार असल्याचं समजत आहे.
तमन्ना भाटियानं ठेवली मालमत्ता बँककडे गहाण : एका रिपोर्टनुसार या मालमत्तेची नोंदणी 27 जून 2024 रोजी झाली होती. या करारासाठी 72 लाख रुपयांचं डिपॉजिट देण्यात आलं होतं. तसंच तमन्ना भाटियानं वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम मुंबई येथील तीन फ्लॅट इंडियन बँकेकडे 7.84 कोटी रुपयांना गहाण ठेवले आहेत. याची 14 जून 2024 रोजी नोंदणी केल्याचं आता समजत आहे. यामध्ये 4.7 लाख रुपयांच्या मुद्रांक शुल्काचा समावेश आहे. तसंच अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये 2595 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या मालमत्तेची कागदपत्रं देखील आता समोर आली आहेत.
स्टार्सच्या मुंबईमधील मालमत्ता : अमिताभ बच्चननं मुंबईतील बोरीवली येथे सुमारे 7 कोटी रुपयांचे दोन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. यानंतर अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चननं देखील याच मजल्यावर 15.42 कोटी रुपयांमध्ये मालमत्ता खरेदी केली होती. बिग बीनं या महिन्यात अंधेरी पश्चिम येथे सुमारे 60 कोटी रुपयांच्या तीन ऑफिस युनिट्स खरेदी केल्या आहेत. याशिवाय काही दिवसापूर्वी काजोलनं देखील दिवसेंदिवस प्रॉपर्टीचे भाव वाढत असल्यानं काही फ्लॅट खरेदी केले होते. आता बॉलिवू़मधील अनेक स्टार्स मुंबईमध्ये प्रॉपर्टी खरेदी करताना दिसत आहेत.
हेही वाचा :
- 'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण, सेटवरील सलमान खानसह रश्मिका मंदान्नाचे फोटो व्हायरल - SALMAN KHAN RASHMIKA MANDANNA
- प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'नं जगभरात 500 कोटींचा टप्पा केला पार - kalki 2898 ad box office collection
- सोनाक्षी सिन्हाचे हाय हिल्स पती झहीर इक्बालनं घेतले हातात, युजर्सनं केलं ट्रोल - Sonakshi Sinha