मुंबई - Ajay Devgn starrer Maidan : कोलकातामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं फुटबॉल प्रेम नवं नाही, मग याला सौरभ गांगुली अपवाद कसा असू शकेल. भारतीय क्रिकेट संघाचा एक आक्रमक कर्णधार अशी ओळख असलेल्या सौरभनं अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट पाहण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे. त्यानं अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबद्दलचं आपलं मत व्यक्त केलंय.
शनिवारी सौरभ गांगुलीनं त्याच्या X अकाउंटवर 'मैदान' चित्रपट पाहिल्यानंतर आपलं परीक्षण लिहिलं आहे. एका क्रिकेटरनं लिहिलेली समीक्षा म्हणून याला अधिक महत्त्व आहे. त्यानं लिहिलंय, "भारताचे महान फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांचं मन मोहून टाकणारं चित्रण आणि भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ. मैदान चित्रपटाचा सिनेमॅटिक अनुभव चुकवू नका. भारताचा आयकॉनिक फुटबॉल स्टार पुन्हा एकदा जिवंत होऊन मोठ्य पडद्यावर या भारतीय स्पोर्ट्स फिल्ममध्ये अवतरला आहे."
गांगुली याच्याशिवाय शाहिद कपूर, करण जोहर आणि वरुण धवन यांच्यासह इतर फिल्म स्टार्सनंदेखील त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर चित्रपटाबद्दलची त्यांची मत शेअर केली आहेत.
शाहिदनं लिहिलंय, "आज मैदान बघताना खूप आनंद झाला. किती सुंदररित्या बनवलेला आणि उत्तम अभिनय असलेला चित्रपट. जा आणि पाहा मित्रांनो. ही तुम्हा सर्वांसाठी एक प्रमाणिक पोस्ट आहे. हा चांगला चित्रपट पाहण्यासाठी अगदी योग्य आहे. संपूर्ण टीमला शुभेच्छा."
करण जोहरनं चित्रपट पाहण्याचं आवाहन करताना म्हटलंय, "मैदान बद्दलच्या सर्वांकडूनच अतुलनीय गोष्टी ऐकल्या आहेत! अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट अभिनयाबद्दल सार्वत्रिकपणे काय म्हटलं जातंय ते पाहण्यासाठी मी देखील स्वतःला रोखू शकत नाही!"
वरुण धवननंही 'बेबी जॉन' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर 'मैदान' पाहण्याची उत्सुकता व्यक्त करताना चित्रपटाचा जयजयकार केला आहे. "चित्रपटाबद्दल ज्या अविश्वसनीय गोष्टी ऐकल्या आहेत आणि या चित्रपटातील शेवटच्या 30 मिनीटांच्या परफॉर्मन्सची चर्चा कानावर पडली त्यामुळे मी आजच माझं तिकीट बुक केलं आहे," असं वरुण धवननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर लिहिलंय.
अमित रविंदरनाथ शर्मा दिग्दर्शित, 'मैदान' हा चित्रपट भारताचे महान फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या फुटबॉलसाठीच्या अतूट समर्पणाचे एक मार्मिक चित्रण आहे. त्यांनी भारतीय फुटबॉल प्रेमींना प्रचंड अभिमान दिला. अजय देवगण या चित्रपटात रहीम यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियमणी, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा -