मुंबई - Varun Dhawan : अभिनेत्री वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. आज, 3 जून रोजी वरुण रुग्णालयातून निघताना दिसला. काही महिन्यांपूर्वीच या जोडप्यानं बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील काही खास स्टार्स उपस्थित होते. सोमवारी वरुण धवन वांद्रे येथील हिंदुजा हॉस्पिटलला रवाना झाला. यानंतर तो हॉस्पिटलमधून बाहेर येत असताना त्याच्या हातात बॅग देखील दिसली. वरुण धवननं यावेळी निळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाची टी-शर्ट परिधान केली होती. यावर्षी फेब्रुवारीमध्ये वरुण आणि नताशा यांनी त्यांच्या प्रेग्नेंसीची बातमी शेअर केली होती.
वरुण धनवनं दिली गुड न्यूज : सोशल मीडियावर वरुण आणि नताशानं एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. या सुंदर फोटोमध्ये वरुण नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत होता. त्यानं हा फोटो शेअर करताना लिहिलं होत की, "प्रेग्नेंट, तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे." या गुड न्यूजनंतर आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, कियारा अडवाणी, जॅकलिन फर्नांडिस, करण जोहर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. दरम्यान, वरुण धवननं त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालबरोबर 24 जानेवारी 2021 रोजी लग्नगाठ बांधली. कोरोनाव्हायरस महामारीमुळे, त्यानं फार कमी पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं.
वरुण धवनचं आगामी चित्रपट : वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आगामी ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'बेबी जॉन'मध्ये दिसणार आहे. 'बेबी जॉन'चं दिग्दर्शन ए. कालीस्वरण यांनी केलंय. हा चित्रपट ॲटली, जीओ स्टुडिओ आणि सिनेमा स्टुडिओ निर्मित करत आहे. याशिवाय तो हॉलिवूड वेब सीरीज 'सिटाडेल'च्या भारतीय रूपांतरामध्येही तो दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू देखील असणार आहे. याशिवाय त्याच्याकडे रोमँटिक कॉमेडी ड्रामा 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' देखील आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे.
हेही वाचा :