ETV Bharat / entertainment

सोनू सूदनं शूज चोरी करणाऱ्या स्विगी डिलिव्हरी बॉयचा केला बचाव, युजर्सनं केलं ट्रोल - SONU SOOD - SONU SOOD

Sonu Sood and Swiggy Delivery Boy : सोनू सूदनं शूज चोरी करणाऱ्या स्विगी डिलिव्हरी बॉयचा बचाव केल्यानंतर, त्याला अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Sonu Sood and Swiggy Delivery Boy
सोनू सूद आणि स्विगी डिलिव्हरी बॉय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 5:32 PM IST

मुंबई - Sonu Sood and Swiggy Delivery Boy : देशाचा खरा हिरो अभिनेता सोनू सूदची स्तुती अनेकजण सोशल मीडियावर करताना दिसतात. त्यानं कोरोनाच्या काळात लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. या काळामध्ये त्यानं देशातील जनतेची खूप मदत केली होती. दरम्यान सोनू सूदबाबत एक बातमी समोर आली आहे. एक डिलिव्हरी बॉय घराबाहेर ठेवलेले शूज चोरतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता सोनून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यानं लिहिलं, "जर स्विगीच्या डिलिव्हरी बॉयनं डिलिव्हरीदरम्यान शूज चोरले तर त्याच्यावर कारवाई करू नका, त्याला एक जोडी शूज आणखी द्या, काही आवश्यकता असू शकते. दयाळू बना."

सोनू सूद झाला ट्रोल : आता युजर्सनी सोनूला एक्स पोस्टवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं की, "जर कोणी तुमची सोन्याची चेन चोरून पळून नेली तर, त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला नवीन सोन्याची चेन विकत घ्या. त्याला कदाचित खरोखर गरज असेल. दुसरा युजर्सनं लिहिलं, "जर एखादा अभिनेता महान बनण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला गांभीर्यानं घेऊ नका, कारण तो त्याच्या कौशल्यानं आपला व्यवसाय उभा करतो. आणखी एकानं लिहिलं, "सर तुमची विचारसरणी खूप चांगली आहे, पण यामुळे चोरीच्या घटना वाढतील." असे बरेच युजर्स आहेत जे सोनूची बाजू घेऊन बोलत असून त्याचे कौतुक करत आहेत.

सोनू सूदचं वर्कफ्रंट : सोनू त्याच्या आगामी ॲक्शन चित्रपट 'फतेह'साठी चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर अनेकांना आवडला होता. या चित्रपटामध्ये सोनूचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'फतेह'चं दिग्दर्शन सोनू सूदचं करत आहे. या चित्रपटाचं नुकतेच सॅन फ्रान्सिस्कोमधील शूटिंग पूर्ण झालं आहे. 'फतेह' चित्रपटामध्ये सोनू सूदशिवाय जॅकलीन फर्नांडिस, शिवज्योती राजपूत आणि विजय राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2024 मध्येच प्रदर्शित होणार आहे. आता पुढं तो 'रामबाण' आणि 'मधा गज राजा' तामिळ चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा' समोर झुकला 'सिंघम'?, बदलली 'सिंघम अगेन'ची रिलीज तारीख, 'रूह बाबा'शी होऊ शकतो सामना - Singham Again release date
  2. विधू विनोद चोप्राच्या 'झिरो से रीस्टार्ट'चे काउंटडाऊन सुरू, उलगडणार '12th फेल'च्या पडद्या मागची गोष्ट - Zero Se Restart
  3. "कोणाच्याही बापाची फिल्म इंडस्ट्री नाही", नेपोटिझमवर विद्या बालनचं स्पष्ट उत्तर - Actress vidya balanमध्ये दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.