ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हाचे हाय हिल्स पती झहीर इक्बालनं घेतले हातात, युजर्सनं केलं ट्रोल - Sonakshi Sinha - SONAKSHI SINHA

Sonakshi Sinha News : बॉलिवूडची नववधू सोनाक्षी सिन्हानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती आपल्या पतीबरोबर दिसत आहे.

Sonakshi Sinha
सोनाक्षी सिन्हा (सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 2:07 PM IST

मुंबई - Sonakshi Sinha News : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाह काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. लग्नानंतर नवविवाहित जोडपे अनेकदा एकमेकांबरोबर काही सुंदर क्षण घातवताना दिसत आहे. नुकताच सोनाक्षीनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं स्पष्ट केलं की, तिचा नवरा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरवा ध्वज आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला सोनाक्षीच्या पायाची झलक दिसत आहे. ती एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससारख्या ठिकाणी फुटवेअर न घालता फिरत आहे. तिचे फुटवेअर हे तिचा पती झहीरनं हातात पकडलं आहे.

सोनाक्षी सिन्हानं पतीबरोबरचा व्हिडिओ केला शेअर : सोनाक्षी ही त्याच्या मागे जात आणि व्हिडिओ शूट करत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिचे कदाचित हाय हिल्सनं टाचा दुखल्या असेल, असे अनेक या पोस्टवर लिहित आहेत. याशिवाय झहीर आपल्या पत्नीची इतकी काळजी घेत असल्यामुळे अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. सोनाक्षीनं हा व्हिडिओ तिचा पती झहीरला टॅग केला आहे. यानंतर त्यानं देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर करून 'आय लव्ह यू बेबी' असं यावर लिहिलं आहे. सोनाक्षी सिन्हानं शेअर केलेला हा व्हिडिओ काहीजणांना पसंत नसल्याचंदेखील दिसत आहेत. या व्हिडिओच्या कमेंट विभागात काहीजण तिच्या घटस्फोटाबद्दलदेखील बोलताना दिसत आहेत.

झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाचं लग्न : 23 जून रोजी सोनाक्षीनं बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत नोंदणीकृत विवाह केला. यानंतर त्यांनी एका आलिशान हॉटेलमध्य इंडस्ट्रीतील लोकांसाठी वेडिंग रिसेप्शन आयोजित केले. यामध्ये सलमान खान, रेखा, काजोल, अनिल कपूर, सोनाक्षीची बेस्ट फ्रेंड हुमा कुरेशी यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. दरम्यान सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'हीरामंडी' या वेब सीरीजमध्ये दिसली होती. ही वेब सीरीज अनेकांना आवडली होती. या पुढं ती 'हाऊसफुल 5' आणि 'निकिता रॉय और द बुक ऑफ डार्कनेस' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या रिया चक्रवर्तीचा आज वाढदिवस, आरोपानंतरही हिंमतीनं दिला होता लढा - RHEA CHAKRABORTY
  2. "तुझ्याशिवाय हे शक्य झालं नसतं...", विश्वचषक जिंकल्यानंतर विराटची अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट - Virat Kohli Instagram Post
  3. गायक अभिजीत भट्टाचार्यनं सलमान खानच्या हिट गाण्याबाबत केला धक्कादायक खुलासा - SINGER ABHIJEET BHATTACHARYA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.