हैदराबाद - Single screen theaters closed : तेलंगणा राज्यातील सिंगल-स्क्रीन थिएटर्स सुमारे दोन आठवडे तात्पुरते बंद राहतील. खरं तर जानेवारीत 2024 च्या संक्रांती नंतर, कोणताही मोठा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरलेला नाही. गेल्या काही आठवड्यांपासून तेलंगणातील चित्रपट व्यवसाय ठप्प झाल्याचं चित्र आहे. चित्रपट व्यवसायाने थिएटर असोसिएशनला 17 मे पासून बंदचा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. या कारणास्तव सिंगल स्क्रीन थिएटर्स काही दिवसासाठी बंद राहणार आहेत.
लवकर मोठ्या चित्रपटाचं प्रदर्शन नाही
संक्रांती 2024 नंतर एकही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. दुसरीकडे, आयपीएल आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी दिसलेली नाही. तेलंगणा थिएटर असोसिएशनच्या मते, राज्यातील अनेक सिंगल-स्क्रीन थिएटर्स 17 मे पासून त्यांचे दरवाजे बंद करू शकतात. रिपोर्ट्सनुसार, तेलंगणामध्ये सिंगल स्क्रीन थिएटर्स 10 दिवसांसाठी बंद राहू शकतात. ही चित्रपटगृहे २६ मे किंवा ३१ मे रोजी पुन्हा सुरू होऊ शकतात.
चित्रपट व्यवसायावर परिणाम
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हजारो चित्रपटगृहे आहेत आणि उन्हाळ्यात लोक नेहमी चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जातात. असं असलं तरी 2024 चा उन्हाळा अनेक थिएटर मालकांसाठी, विशेषतः सिंगल-स्क्रीनसाठी चांगला राहिला नाही. मोठ्या बजेटचे चित्रपट चमक दाखवू शकले नाहीत, तर लहान आणि मध्यम बजेटचे चित्रपटही कुचकामी ठरले आहेत. त्यामुळे चित्रपट व्यवसायावर परिणाम झाला आहे.
विश्वक सेन यांच्या 'गँग्स ऑफ गोदावरी'साठी 31 मे रोजी सिंगल-स्क्रीन थिएटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. याशिवाय अनेक थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स 'कल्की 2898 एडी', 'पुष्पा: द रुल', 'गेम चेंजर', 'विश्वंभरा' आणि 'इंडियन 2' सारख्या बिग बजेट चित्रपटांवर आशा बाळगून आहेत.
हेही वाचा -