ETV Bharat / entertainment

दुबईत पावसाचा कहर! पाहा, गायक राहुल वैद्यनं शेअर केलेला भीषण पुराचा व्हिडिओ - rahul vaidya - RAHUL VAIDYA

Rahul vaidya : राहुल वैद्यनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो दुबईमधील निसर्गाच्या कहराचा सामना करताना दिसत आहे.

Rahul vaidya
राहुल वैद्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 1:13 PM IST

मुंबई - Rahul vaidya : गायक राहुल वैद्यचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो दुबईमधील पावसाच्या पाण्यात दिसत आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळपर्यंत यूएईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू होता. यानंतर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साठताना दिसलं. दुबईमधील परिस्थिती पुरासारखी झाली. आता तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गायक राहुल वैद्यही आता अशाच परिस्थितीत अडकला होता. राहुल नुकताच दुबईला त्याच्या कुटुंबाबरोबर आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेला होता, मात्र पावसानं त्याचा सर्व प्लॉन खराब केला.

Rahul vaidya
राहुल वैद्य

राहुल वैद्यनं शेअर केला दुबईमधील पूराचा व्हिडिओ : राहुलला दुबईममध्ये निसर्गाच्या कहराचा सामना करावा लागला होता. दुबईमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरात जोरदार पूर आला आहे. शहरे नद्यांमध्ये बदलले आहेत. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी साचलेलं आहे. सध्या दुबईची परिस्थिती खूप गंभीर आहे. दरम्यान राहुलनं सोशल मीडियावर या भयानक दृश्याची झलक शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये राहुल हातात शूज घेऊन पाण्यातून चालताना दिसत आहे. त्यानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी आल्याचं दिसत आहे. याशिवाय सोशल मीडियावर राहुलचा होत असलेल्या पुराच्या व्हिडिओवर अनेकज कमेंट्स करून त्याला काळजी घेण्यास सांगताना दिसत आहेत. तसेच त्यानं इन्स्टा स्टोरीवर चाहत्यांना दुबईमध्ये घालवलेल्या खास क्षणांची झलकही दाखवली आहे.

राहुल वैद्यच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल : 'बिग बॉस 14' फेम गायक राहुलनं टीव्ही अभिनेत्री दिशा परमारबरोबर लग्न 2021मध्ये केलं. या जोडप्यानं सप्टेंबर 2023 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केलं. राहुल आणि दिशाची जोडी अनेकांना आवडते. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. राहुल अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. राहुलचे इन्स्टाग्रामवर 4.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. दरम्यान त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं नुकतेच बालीमध्ये एका म्युझिक अल्बमचं शुट केलं आहे.

Rahul vaidya
राहुल वैद्य

हेही वाचा :

  1. सलमानच्या जीवावर उठलेल्यांना सलमीन खाननी म्हटलं 'जाहिल लोग', मुंबई पोलिसांचं केलं कौतुक!! - Salman Khan
  2. सुपरस्टार विक्रम साजरा करतोय 58 वा वाढदिवस, 2024 मध्ये अर्धा डझन चित्रपट रिलीजसाठी सज्ज - happy birthday vikram
  3. विद्या बालननं सांगितला 'दो और दो पांच'च्या शीर्षकाचा किस्सा, फुल्ल टू धमाल कॉमेडी करायची व्यक्त केली इच्छा! - Vidya Balan interview

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.