ETV Bharat / entertainment

सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा'चं स्काई डाइविंगसह पोस्टर रिलीज

Yodha Teaser Release Date OUT : सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत 'योद्धा'च्या टीझरची रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. स्काई डाइविंग करून या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं गेलं आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 1:25 PM IST

मुंबई - Yodha Teaser Release Date OUT : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या बहुप्रतीक्षित 'योद्धा' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचा निर्माता करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 'योद्धा' चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'योद्धा'च्या टीझर रिलीज डेटच्या घोषणेबरोबर एक व्हिडिओही रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडिओत 'योद्धा' चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थचे पोस्टर हेलिकॉप्टरमधून स्काई डाइविंग करून प्रदर्शित करण्यात आले आहे. स्काई डाइविंग करून पोस्टर रिलीज करणं हे खूप हटके असल्याचं आता अनेकजण सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन म्हणत आहेत.

टीझर कधी रिलीज होणार? : 'योद्धा'चा टीझर 19 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. अनेकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी 'योद्धा' 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. त्याआधीही हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज होता, मात्र त्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट 8 डिसेंबर 2023 ठेवण्यात आली होती. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपट 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर टक्कर दिली असती. यानंतर 'मेरी ख्रिसमस' रुपेरी पडद्यावर रिलीज झाला, मात्र 'योद्धा'ला आणखी एक नवीन रिलीज डेट मिळाली. 'योद्धा' चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करताना करण जोहरनं लिहिलं, 'आम्ही आकाशात उडण्याची तयारी केली आहे, 'योद्धा' 15 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहात येत आहे.''

योद्धा चित्रपटाबद्दल : पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे. 'योद्धा' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राशिवाय दिशा पटानी, साऊथ अभिनेत्री राशि खन्ना, अमित सिंह ठाकूर आणि इतर कलाकार दिसणार आहेत. आता सिद्धार्थच्या चाहत्यांना या ॲक्शन-ड्रामा चित्रपटासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खानला बनायचं आहे 'जेम्स बाँडचा व्हिलन', हॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलला किंग खान
  2. अबुधाबीतील मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात लावली अक्षय कुमार आणि शंकर महादेवननं हजेरी
  3. "चित्रपट चांगला बनला नाही तर अगदी पंतप्रधान मोदींचा बायोपिकही चालत नाही": बहिष्कार संस्कृतीवर प्रकाश झा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.