हैदराबाद: Siddharth and Aditi Rao Hydari : अभिनेता सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांनी तेलंगणा राज्यातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापूर येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्नगाठ बांधली आहे. दोघांचं मंदिरात लग्न झाल्याच्या बातम्या स्थानिक पोर्टल्सने बातम्या कव्हर केल्यामुळे या बातमीला दुजोरा मिळालाय. 'महा समुद्रम' (2021) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते प्रेमात पडले.
अदिती राव यांचे आजोबा हे वानापर्थी संस्थानमचे अंतिम शासक होते. त्यांचे कुटुंब सुप्रसिद्ध मंदिरात पूजा करतात, म्हणून तिने हे मंदिर तिच्या लग्नाचे ठिकाण म्हणून निवडले. हे मंदिर शतकानुशतके जुने आहे आणि त्याची स्थापना 18 व्या शतकात झाली होती. सिद्धार्थ हा मूळचा तामिळनाडूचा रहिवासी असल्यामुळे लग्नाचे विधीसंस्कार तामिळनाडूतील पुरोहितांनी केले. असे असले तरी सिद्धार्थ किंवा आदिती राव या दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही.
त्यांच्या गुप्त लग्नाप्रमाणेच सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांनी त्यांचे नाते कायम गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न केलाय. या जोडप्याचे आधीच लग्न झालेले असूनही, त्यांचा एकत्र पहिला फोटो अद्याप ऑनलाइन प्रसिद्ध झालेला नाही. माहितीनुसार, हे जोडपे लवकरच त्यांच्या लग्नाची जाहीर घोषणा करणार आहेत. दरम्यान, दोघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाला शुभेच्छा दिल्या आहेत.
कामाच्या आघाडीवर, अदिती यापुढे 'गांधी टॉक्स' या मूक चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये विजय सेतुपती आणि सिद्धार्थ जाधव यांच्याही भूमिका आहेत. अदिती इंडो-यूके को-प्रॉडक्शन 'लायनेस'मध्ये काम करण्यासाठीची तयारी करत आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ याने 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चिथा' या चित्रपटात अखेरचा दिसला होता. विशेष म्हणजे त्यानेच या चित्रपटाची निर्मिती केली होती. एसयू अरुण कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांनाही खूप आवडला होता. हा चित्रपट सध्या डिस्ने प्लस हॉट स्टारवर उपलब्ध आहे.
कमल हासन, काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत दिग्दर्शक शंकरच्या 'इंडियन 2' मध्ये सिद्धार्थ देखील दिसणार आहे. 2019 पासून चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. परंतु 2020 मध्ये कोविड महामारी आणि सेटवर झालेल्या अपघातामुळे चित्रपट पूर्ण होण्यास विलंब झाला. चित्रपटाचे शूटींग पूर्णत्वास आले असून, फक्त काही गाण्यांचे रेकॉर्डिंग बाकी आहे.
हेही वाचा -