मुंबई - Palak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आपल्या लूकमुळे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून नेहमीच आपले सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते. दरम्यान आता तिचा एक व्हिडिओ पापाराझीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच देखणी दिसत आहे. काल 17 ऑगस्ट रोजी रात्री ती मुंबईतील एका रेस्टॉरंट लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली. यावेळी तिनं गोल्डन टॉप आणि डेनिम परिधान केला असून तिच्या हातात पर्स होती. यावेळी ती खूप आकर्षक दिसत होती.
पलक तिवारीचा व्हिडिओ व्हायरल : पलकनं या कार्यक्रमादरम्यान पापाराझीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिनं पॅप्सला केक कापण्यास सांगितलं. यानंतर केक हा कट करण्यात आला. तसेच जेव्हा बर्थडे बॉयनं केक हा पलकला देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती त्याला आधी खाण्यास सांगते. यानंतर तो केक खातो. याशिवाय पकलनं देखील बर्थडे बॉयची इच्छा पूर्ण करत केक थोडा खाल्ला. यावेळी पलकनं बर्थडे बॉयला शुभेच्छा दिल्या आणि तिथून निघून गेली. आता पलकचा हा व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला आहे. या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहे. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "खूप छान गिफ्ट मिळालं वाढदिवसाला." दुसऱ्या एकानं लिहिलं, "वाढदिवस असा पाहिजे."
हार्डी संधूच्या गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी : पलक तिवारीनं सलमान खान स्टारर 'किसा का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय तिनं हार्डी संधूच्या 'बिजली बिजली' या गाण्यात जबरदस्त डान्स करून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली. पलकनं तिच्या कारकिर्दीत फक्त एकच चित्रपट आणि एक म्युझिक व्हिडिओ केला आहे, मात्र तिचे चाहते सोशल मीडियावर 4.7 मिलियन आहेत. आता पलक ही तिच्या पुढील प्रोजेक्ट्सची तयारी करत आहे, ती कोणताही कार्यक्रमात आवर्जून जात असते.
हेही वाचा :
- इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांच्या नात्याबद्दल झाला खुलासा, वाचा सविस्तर - Palak and Ibrahim Dating
- सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान पलक तिवारीला गर्दीपासून वाचवताना झाला स्पॉट
- Aaliyah Kashyap engagement bash : आलिया कश्यपच्या एंगेजमेंटला स्टार किड्सची मांदियाळी, सुहाना ते पलक तिवारीची कथित बॉयफ्रेंडसोबत हजेरी