मुंबई - सौंदर्यवती श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असललेली बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती तिच्या चाहत्यांना तिच्या ऐश्वर्यसंपन्न लाईफ स्टाईलची झलक दाखवत असते. चित्रपट लेखक राहुल मोदी बरोबर तिची वाढती मैत्री चाहत्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. ती राहुलबरोबर डेट करत असल्याचा त्यांचा अंदाज आहे. अलिकडे तिच्या गळ्यात 'आर' अक्षर असलेला पेंडेंटही दिसला होता. काही दिवसापूर्वी अभिनेत्री श्रद्धानं एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे की हे जोडपं हिल स्टेशनवर एकत्र सुट्टी घालवत आहे.
बुधवारी 19 जूनच्या पहाटे, श्रद्धा कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा नवीन सेल्फी पोस्ट केला आहे. या सेल्फीमध्ये ती एकटी नाही तर, तिच्याबरोबर तिचा कथित प्रियकर-चित्रपट लेखक राहुल मोदीही होता. फोटो शेअर करताना तिनं खुलासा केला आहे की, राहुल मोदींमुळे तिची झोप उडाली आहे.
पोस्टच्या कॅप्शनवरून असं दिसतं की श्रद्धानं तिच्या अफवा कथित बॉयफ्रेंडबरोबरचं नातं अधिकृतपणे घोषित केलं आहे. सेल्फी शेअर करताना, तिनं स्मायली आणि मजेदार इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिलं, "हृदय तुझ्या जवळ ठेवून घे पण, झोप तरी परत कर ना यार." असं लिहिलेल्या या पोस्टला तिनं पार्श्वसंगीत म्हणून 'इश्क' चित्रपटातील 'नींद चुराई मेरी' हे गाणे निवडलं आहे.
श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट
श्रद्धानं तिच्या अभिनय कारकिर्दीला 'तीन पत्ती' या चित्रपटात छोट्याशा भूमिकेतून सुरुवात केली होती. पण 2011 मध्ये 'लव का द एंड'मध्ये दमदार अभिनय करून ती लवकरच प्रसिद्धीस आली. त्यानंतर तिनं 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'बागी', 'हैदर', 'हाफ गर्लफ्रेंड', 'हसीना पारकर', 'स्त्री' असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या, ती तिच्या आगामी चित्रपट 'स्त्री 2' च्या शूटिंगमध्ये गुंतली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -