ETV Bharat / entertainment

हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील कलाकार उत्साहात साजरा करत आहेत 'व्हॅलेंटाईन्स डे' - व्हॅलेंटाईन्स डे

Valentine's Day 2024 : 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त आज अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. आता काही कलाकरांनी आपल्या जोडीदाराविषयी विशेष पोस्ट शेअर करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

Valentine's Day 2024
व्हॅलेंटाईन्स डे 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 11:57 AM IST

मुंबई - Valentine's Day 2024 : आज 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त अनेकजण पोस्ट शेअर करून आपल्या प्रेमाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. या दिवशी काही प्रेमवीर आपल्या जोडीदाराला काही गिफ्ट देऊन आनंदी करतात. दरम्यान हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील स्टार्सही आपल्या जोडीरादाला 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या विशेष प्रसंगी शुभेच्छा देत आहेत. शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि मुलांसोबत 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा करण्यासाठी देशाबाहेर गेली आहे. तसेच दिशा पटानीलाही तिचा व्हॅलेंटाइन मिळाला आहे. याशिवाय बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरसह अनेक सेलिब्रिटी व्हॅलेंटाईन डे एन्जॉय करत आहेत.

शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टीला पती राज कुंद्रानं 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजनं पत्नीच्या नावानं एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय या पोस्टमध्ये एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये राज आणि शिल्पाचे रोमँटिक फोटो आहे. शिल्पानं देखील आपल्या पतीबरोबर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

दिशा पटानी : 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी दिशा पटानीला गुलाबांनी भरलेला पुष्पगुच्छ मिळाला. दिशानं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉट दिसत आहे. याशिवाय तिनं तिच्या फोटोसोबत लाल हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे.

उपासना कामिनेनी : साऊथचा सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनीनं 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत उपासना, राम चरण आणि त्यांची मुलगी कलिन कारा यांचे हात दिसत आहेत.

माधुरी दीक्षित : या विशेष दिनानिमित्त माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने यांनी पत्नी माधुरी आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ''माय फॉरेव्हर व्हॅलेंटाईन्स.'' या पोस्टला अनेकजण लाईक करत आहेत.

करण सिंग ग्रोव्हर -बिपाशा बसु : 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू हे दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या जोडप्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, ''माय फॉरेव्हर व्हॅलेंटाईन्स.'' करण आणि बिपाशा हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघेही अनेकदा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

हेही वाचा :

  1. 'रामायण'साठी रणबीर कपूरचा रामाचा लूक ठरला
  2. वरुण तेज स्टारर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'ची टीम पुलवामा स्मारक स्थळाला भेट देणार
  3. 'बिग बॉस 14' फेम कपल पवित्रा पुनिया आणि एजाज खानचं झालं ब्रेकअप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.