मुंबई Sheena Bora : शीना बोराच्या कथित अस्थी आणि अवशेष सापडले नसल्याचा अहवाल दिल्यानंतर काही आठवड्यांनी ते नवी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात सापडल्याचं फिर्यादीनं ट्रायल कोर्टाला सांगितलं. शीना बोरा (24) हिची 2012 मध्ये तिची आई इंद्राणी मुखर्जी आणि इतरांनी हत्या केल्याचा आरोप आहे. शीनाच्या अस्थी गहाळ नसून त्या एका न्यायवैद्यक तज्ञाकडे असल्याचा आरोप ट्रायल कोर्टाला मिळालेल्या ईमेलच्या एका दिवसानंतर झाला होता, ज्यानं त्यांची तपासणी केली होती आणि साक्षीदार म्हणून ती कोर्टात सादर करत होती.
ईमेलमध्ये कोणता आरोप : या साक्षीदारानं अचानक खूप संपत्ती मिळवली, असा आरोप या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती एस पी नाईक निंबाळकर यांनी कोर्टात उपस्थित बचाव पक्षाच्या वकिलांना ईमेलबाबत माहिती दिली. हे वाचून वकिलांनी या आरोपाची चौकशी करावी, असं सांगितलं. यानंतर न्यायाधीशांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून उत्तर मागितलं.
नेमकं प्रकरण काय : 24 एप्रिल रोजी शीनाचे अवशेष बेपत्ता झाल्याची माहिती प्रथम न्यायालयाला दिली आणि 10 जून रोजी ते सापडले नाहीत असं फिर्यादीनं सांगितलं. फिर्यादी सी जे नांदोडे म्हणाले, 'दरम्यान, कार्यालयाच्या स्टोअररुमची पुन्हा झडती घेतली असता, त्याठिकाणी अवशेष सापडले.' या हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आता जामिनावर बाहेर आली आहे. 2015 मध्ये खुनाचे हे प्रकरण उघडकीस आले होते.
2012 मध्ये खून, 2015 मध्ये आलं उघडकीस : शीना बोराची 2012 मध्ये हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर 2015 मध्ये हे प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा माजी पती पीटर मुखर्जी आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यावर खुनाचा आरोप आहे. त्यांनी शीनाचा मृतदेह महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण गावच्या जंगलात नेऊन जाळल्याचं सांगण्यात आलं. पेण गावातून पोलिसांनी काही हाडं जप्त केली होती. तपासादरम्यान ती एका माणसाची असल्याचं समोर आलं. सध्या इंद्राणी, पीटर आणि श्यामवर जामिनावर आहेत. काहीवेळा इंद्राणीनं तिची मुलगी जिवंत असल्याचाही दावा केला होता. ती काश्मीर मध्ये दिसल्याचं इंद्राणीनं सांगितलं होतं. त्यामुळे हे प्रकरण अजूनही तपासाच्या चक्रात अडकलेलं आहे.
हेही वाचा :