ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "जे लग्नाच्याबाबत आनंदी.." - SHATRUGHAN SINHA - SHATRUGHAN SINHA

Shatrughan Sinha Health Update: शत्रुघ्न सिन्हा यांनी रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दलदेखील उल्लेख केला.

Shatrughan Sinha Health Update
शत्रुघ्न सिन्हा हेल्थ अपडेट ((फाइल फोटो) (ani))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 11:50 AM IST

मुंबई - Shatrughan Sinha Health Update: अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा हे मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या लग्न आणि त्यांच्या तब्येतीमुळे चर्चेत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते घरातील सोफ्यावरून पडून जखमी झाल्याची सोशल मीडियात चर्चा होती. याशिवाय त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, असंदेखील सोशल मीडियावर म्हटलं होतं. शत्रुघ्न यांच्या तब्येतीबद्दल चाहते खूप चिंतेत आहेत. आता शत्रुघ्न सिन्हा यांनी शस्त्रक्रियेच्या चर्चेवर मौन सोडले आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये का दाखल करण्यात आले? याबद्दल त्यांनी उघडपणे सांगितलं.

शत्रुघ्न सिन्हा यांनी केला खुलासा : शत्रुघ्न सिन्हा यांना जेव्हापासून दाखल करण्यात आले आहे, तेव्हापासून अनेकांना त्यांच्या तब्येतीचे अपडेट जाणून घ्यायचे होते. आता त्यांनी स्वत: चाहत्यांना प्रकृतीबद्दलची अपडेट दिली आहे. शत्रुघ्न यांनी म्हटलं, "अरे माझी शस्त्रक्रिया झाली. पण मलाच माहीत नाही." यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत विचारले असता त्यांनी पुढं सांगितलं, "मला रुटीन बॉडी चेकअपसाठी दाखल करण्यात आलं होतं. मी वयाच्या साठीनंतर प्रत्येकाला वर्षभरातून एकदा संपूर्ण शरीराची तपासणी करण्याचा सल्ला देतो. गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक प्रचारासाठी मी सतत प्रवास करत आहे. यानंतर लगेच माझ्या मुलीचे लग्न झालं. तीन शिफ्टमध्ये काम करून तरुणांसारखी माझ्या शरीरात उर्जा आता उरली नाही. जरा हळू चाललं पाहिजे."

मुलीच्या लग्नाने आनंदी : शत्रुघ्न सिन्हांनी पुढे म्हटलं, "माझ्या मुलीचे लग्न झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. सर्व चांगले झाले. मी देवाचे आभार मानतो की, माझी मुलगी आता तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. आता जे आनंदी नाहीत, त्यांच्यासाठी माझे काही म्हणणे नाही." दरम्यान सोनाक्षी सिन्हानं 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न केलं. लग्नानंतर या जोडप्यानं मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्न आणि रिसेप्शनचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नामुळे अनेकजण नाराज असल्याचं दिसत आहेत. काही युजर्स आतादेखील या जोडप्याला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूरनं लखनौमध्ये चाहत्यांना मिठी मारून घेतली भेट, सोशल मीडियावर नेटिझन्सनं केलं कौतुक - shraddha kapoor
  2. अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या आधी मुकेश, नीता अंबानी यांनी लावली 50 वंचित जोडप्यांची लग्नं - Mukesh and Nita Ambani
  3. कोल्हापूरच्या तरुणाची कमाल, फॉलोअर्सची नावं लिहिली फोर्ड मस्टैंग कारवर - A person from Kolhapur

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.