ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार स्टारर 'शंभू' गाणं प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 11:14 AM IST

Shambhu Song releases : अभिनेता अक्षय कुमारचं 'जय महाकाल' गाणं 5 फेब्रुवारीला रिलीज झालं आहे. हे गाणं अनेकांना खूप आवडल्याचं दिसत आहे.

Shambhu Song releases
शंभू गाणं प्रदर्शित

मुंबई - Shambhu Song releases : हिंदी चित्रपटसृष्टीतील 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ॲक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'मुळे चर्चेत आहे. त्याचा हा आगामी चित्रपट उन्हाळ्यात ईदच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात टायगर श्रॉफही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटात अक्षय बडे मियाँची भूमिका साकारणार असून टायगर हा छोटे मियाँची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, अक्षय कुमारचे 'जय महाकाल' हे गाणे रिलीज झाले आहे. अक्षय कुमारनं सुधीर यदुवंशीसोबत 'शंभू' गाणं गायले आहे. अक्षयचं हे गाणं खूप अनेकांना आवडलं आहे. या गाण्यात अक्षय कुमार भगवान शिवाची भक्ती करताना दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अक्षय कुमारचं 'शंभू' गाणं झालं रिलीज : 2023 रोजी रिलीज झालेले 'ओ माय गॉड' या चित्रपटात महादेवाची भूमिका साकारणारा अक्षय कुमार पुन्हा एकदा भगवान शंकराच्या अवतारात दिसला आहे. या गाण्यामध्ये अक्षय हा महादेवसारखा तांडव करताना दिसत आहे. अक्षय कुमारनं या गाण्याचा टीझर शेअर करत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं, ''जय महाकाल, हे गाणं 5 फेब्रुवारीला रिलीज झालं आहे.'' 'जय महाकाल' गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केली आहे. या गाण्याचे संगीतकार विक्रम मॉन्ट्रोज असून याचे बोल अभिवन शेखरनं लिहिले आहेत.

अक्षय कुमारचं वर्कफ्रंट : अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो 'धूम 4', 'हाऊसफुल्ल 5', 'राउडी राठोड 2', स्टार्ट अप, स्काय फोर्स, आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटामध्ये दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, रवीना टंडन, श्रेयस तळपदे आणि इतर कलाकार दिसणार आहेत. अक्षयचा हा चित्रपट कॉमेडी असल्याचं सांगितलं जातं. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान यांनी केलंय. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाकडून अक्षयला खूप अपेक्षा आहेत.

हेही वाचा :

  1. अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर 'ब्लॅक' चित्रपट 19 वर्षानंतर ओटीटीवर प्रदर्शित
  2. शंकर महादेवन, झाकीर हुसैन यांना सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार
  3. व्हॅलेंटाईनच्या आधी 'मेरे ख्वाबों में जो आये' गाण्यावर शहनाझ गिलचा कुशा कपिलासोबत डान्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.