ETV Bharat / entertainment

'फर्जी' वेब सीरीजला वर्ष पूर्ण झाल्यानं शाहिद कपूरनं शेअर केली पोस्ट, चाहत्यांनी विचारला 'हा' प्रश्न

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 5:57 PM IST

Shahid Kapoor News: अभिनेता शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरीजला एक वर्ष पूर्ण झालयं. यानिमित्त त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून चाहत्यांनी शाहिदला प्रश्न विचारले आहेत.

Shahid Kapoor
शाहिद कपूर

मुंबई - Shahid Kapoor News: अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट अनेकांना आवडत आहे. शाहिद हा ओटीटीवर दमदार पदार्पण करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत आहे. 2023 रोजी प्रदर्शित झालेली त्याची 'फर्जी' वेब सीरीज खूप गाजली होती. ही ब्लॅक कॉमेडी क्राईम थ्रिलर वेब सीरीजची कहाणी ही खूप वेगळी होती. यामध्ये शाहिदनं शानदार अभिनय केला. 'फर्जी' या वेब सीरीजमधील डायलॉग खूप प्रसिद्ध झाले आहेत. आज ही वेब सीरीज प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. शाहिदनं 'फर्जी'ला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद हा खास पद्धतीनं साजरा केला.

शाहिद कपूरनं केली पोस्ट शेअर : शाहिदनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं. तसेच, त्यांनं या वेब सीरीजचे वर्णन एक अद्भुत कलाकृती म्हणून केलं आहे. या वेब सीरीजमध्ये शाहिदबरोबर विजय सेतुपती, भुवन अरोरा साऊथ अभिनेत्री राशि खन्ना आणि केके मेनन हे कलाकार दिसले होते. आठ भागांची ही वेब सीरीज गेल्या वर्षी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली होती. 'फर्जी' वेब सीरीजमध्ये पैसा कमविण्यासाठी माणूस काय करू शकतो, हे दाखविण्यात आलं आहे. या वेब सीरीजमध्ये प्रत्येक कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे.

चाहते दुसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत : शाहिदचे चाहते त्याच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक चाहते कॉमेंट बॉक्समध्ये त्याच्या दुसऱ्या सीझनबद्दलची अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत. एका व्यक्तीनं या पोस्टवर लिहिलं, ''या मास्टरपीसच्या दुसऱ्या सीझनची वाट मी पाहत आहे.'' तर दुसऱ्या एकानं या पोस्टवर कमेंट करत शाहिदला विचारले की, ''फर्जी'चा दुसरा सीझन कधी येईल सर.. मी खूप उत्सुक आहे.'' याशिवाय आणखी एका वापरकर्त्यानं लिहिलं, ''सर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. मला तुमचे प्रत्येक चित्रपट आवडतात' त्याचबरोबर अनेक यूजर्स या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'व्हॅलेंटाईन डे'ला पती पत्नीला कोणती भेट देतात, अभिनेत्री ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत
  2. किरण रावनं 'लाल सिंग चड्ढा'च्या बॉक्स ऑफिसवरील निराशाजनक कामगिरीबद्दल केला खुलासा
  3. 'तेरी बातों में उल्झा जिया'च्या कमाईत वाढ ; रिलीच्या दुसऱ्या दिवशी केली 'इतकी' कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.