मुंबई - Shah Rukh Khan New Movie : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या त्याची आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्ससाठी मैदानात हजर राहून खेळाडूंना प्रोत्साहित करत आहे.
2024 या वर्षाचा अर्धा काळ संपत आला असून किंग खानने अद्याप त्याच्या कोणत्याही चित्रपटाची घोषणा केलेली नाही. 2023 मध्ये शाहरुख खानने तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. पठाण, जवान आणि डंकी या तीन चित्रपटांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 2500 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता. आता शाहरुख खानने त्याच्या पुढच्या चित्रपटाचे मोठे अपडेट दिले आहे.
शाहरुख खानबद्दल असे बोलले जात होते की तो यशराज स्पाय युनिव्हर्सच्या 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल 2024 मध्ये सुरू करेल, परंतु तसे घडले नाही. आता शाहरुखबद्दल असे बोलले जात आहे की तो जून 2024 पासून त्याच्या नवीन प्रोजेक्टची तयारी सुरू करणार आहे. मिळालेल्या खात्रीशीर बातम्यानुसार शाहरुख खान आयपीएल संपल्यानंतर जूनमध्ये सुजॉय घोषच्या किंग या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. किंग खाननेही सांगितले आहे की, तो इतके महिने शूटिंग सेटपासून का दूर आहे.
मला विश्रांतीची गरज आहे - शाहरुख खान
एका स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना शाहरुख खानने याचा खुलासा केला आहे. शाहरुख खान म्हणाला, मला वाटले की मी थोडी विश्रांती घ्यावी. मी दोन-तीन चित्रपट केले आहेत आणि या तीन चित्रपटांसाठी मला शारीरिकदृष्ट्या खूप मेहनत करावी लागली, त्यामुळे मला विश्रांती हवी आहे. म्हणून मी माझ्या टीम केकेआरला सांगितले की मी येईन आणि सर्व सामन्यांना हजर राहीन.
शाहरुख पुढे म्हणाला की, माझ्या आगामी चित्रपटाचे शूटिंग जुलै किंवा ऑगस्टमध्ये सुरू होईल. आम्ही जूनमध्ये नियोजन केले होते, त्यानुसार आता जूनपासून काम सुरू होईल. आयपीएलही संपेल आणि मीही मोकळा होईल. किंग या चित्रपटात शाहरुखच्या बरोबर त्याची मुलगी सुहाना खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा -