दुबई ( यूएई ) - सुपरस्टार शाहरुख खान बुधवारी दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट (WGS) मध्ये सहभागी झाला होता. यावेळी झालेल्या पत्रकार रिचर्ड क्वेस्ट यांच्याशी संवादात्मक सत्रात त्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याच्या अनेक दशकांच्या प्रवासाबद्दल खुलासा केला. हॉलिवूडच्या चित्रपटांबद्दलही त्यानं आपली मतं सांगितली.
त्यानं अद्यापही पाश्चिमात्य फिल्म इंडस्ट्रीकडे पाऊल का टाकले नाही? असा प्रश्न विचारले असता शाहरुख म्हणाला, ''मी हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, परंतु कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. याबाबत कोणीही मला ऑफर दिलेली नाही. मी तिथल्या लोकांशी संवाद साधलाय. मला माहिती आहे की पाश्चिमात्य देशात, अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये, इंग्लिश फिल्म इंडस्ट्रीत खूप चांगले लोक आहेत, पण कोणीही मला कामाची ऑफर दिलेली नाही. कलाकारांनी सीमा ओलांडल्या पाहिजे हे मी ऐकलंय, परंतु तरीही मला ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला शिकायचे आहे. त्यामुळे, मला हॉलीवूड किंवा इंग्लंडमध्ये कधीही चित्रपटाची ऑफर आलेली नाही."
मात्र, शाहरुखने कबूल केलं की, डॅनी बॉयलच्या 'स्लमडॉग मिलेनियर' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात त्याला भूमिकेची ऑफर आली होती, परंतु त्यानं ती नाकारली होती. "होय,माझ्याकडे स्लमडॉग आला होता, आणि मी मिस्टर बॉयलसोबत खूप वेळ घालवला. तो खूप छान आहे. पण मी टेलिव्हिजनवर 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर' करत होतो, पण मला असे वाटले की चित्रपटातील कथेत जी व्यक्ती आहे त्याचं होस्टिंग खूप वाईट होतं. शो प्रोड्यूस करणाऱ्या लोकांना मी चित्रपट करावा अशी इच्छा होती. पण कथेचं पात्र फसवणूक करतं आणि एक होस्ट म्हणून अप्रमाणिक राहतं, हे मला खूप विचित्र वाटलं आणि मी मिस्टर बॉयलला समजावून सांगितले की मला हे आवडणार नाही, आणि माझ्यापेक्षा बरेच चांगले अभिनेते आहेत. अनिल कपूर यांनी ते केले, आणि तो होस्ट म्हणून त्यांनी विलक्षण काम केलं," असं शाहरुख म्हणाला.
शाहरुखनं सांगितलं की, त्याला ब्रिटीश गुप्तहेर जेम्स बाँड करायला आवडेल, पण तो करु शकत नाही. तो म्हणाला, "आय एम जेम्स बाँड." त्याला नाव विचारले असता बॉलिवूडचा किंग खान म्हणाला, "मला खरंच बाँडची भूमिका करायची आहे. पण मला वाटतं की खूप छोटा आहे, पण मी जेम्स बाँडचा खलनायक होण्यासाठी पुरेसा बाऊन आहे."
शाहरुख खाननं 2023 मध्ये चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं आणि आपल्या कामातून त्यानं विरोधकांची बोलती बंद केली. जानेवारी महिन्यात त्याचा पठाण रिलीज झाला. यामधील त्याच्या अॅक्शन अवताराने सर्वांनाच चकित केलं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आणि भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत नाव मिळवण्यात यश मिळविले. 'पठाण' प्रमाणेच 'जवान'नेही प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली. शाहरुख इतक्यावरच थांबला नाही. 21 डिसेंबर रोजी, तो राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपट घेऊन आला. 'डंकी' शीर्षक असलेला हा चित्रपट इमिग्रेशनच्या मुद्द्यावर केंद्रित आहे. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्याने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला.
हेही वाचा -