ETV Bharat / entertainment

SRK teaches Ed Sheeran : शाहरुख खानने गायक एड शीरनला शिकवली त्याची आयकॉनिक सिग्नेचर पोज, पाहा व्हिडिओ - Shah Rukh Khan signature pose

SRK teaches Ed Sheeran : गायक एड शीरन सध्या भारतात आलाय. 16 मार्च रोजी होणाऱ्या त्याच्या इव्हेन्टपूर्वी त्यानं बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सेलेब्रिटींच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. अलिकडेच त्यानं फराह खान आणि शाहरुख खानची भेट घेतली. यावेळी त्याला शाहरुखनं त्याची सिग्नेचर पोज शिकवली, त्याचा व्हिडिओ त्यानं इन्स्टाग्रामवर केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 10:51 AM IST

Updated : Mar 14, 2024, 11:32 AM IST

मुंबई - SRK teaches Ed Sheeran : दोन्ही हात लांब मोकळे सोडून चेहऱ्यावर मंद हसू ठेवत, घुडघ्यापासून पाय वाकवून कंबरेपासून पाठ मागे करत, आपल्या आयकॉनिक सिग्नेचर पोझसह शाहरुख खानने गेल्या तीन दशकापासून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय. त्याच्या डायहार्ड फॅनपासून दिग्गज सेलेब्रिटीपर्यंत लोक त्याच्या या रोमँटिक पोझची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. शाहरुखला भेटल्यानंतर आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटींनाही त्याला अशी पोज देताना पाहायचे असते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेला, जगभरातील तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेला लोकप्रिय ब्रिटीश गायक एड शीरनलाही शाहरुखच्या भेटीमध्ये आपला मोह आवरता आला नाही. सध्या एड शीरन आशिया दौऱ्याच्या निमित्ताने भारतात आलाय. मुंबईत त्यानं शाहरुख आणि कोरिओग्राफर फराह खान यांची भेट घेतली. याचे काही व्हिडिओ शीरनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामधील एका क्लिपमध्ये शाहरुख खान गायक एड शीरनला एडला त्याची सिग्नेचर पोज शिकवताना दिसत आहे. पोज देऊन झाल्यावर किंग खानने एडला आपल्या उबदार मिठीत घेतले आणि त्याचे चुंबन घेवून स्वागत केले.

"आमचा हा आकार देण्याचा प्रयत्न एकत्रीत प्रेमाचा प्रसार करण्यासाठी आहे", अशा आशयाचे कॅप्शन गायक शीरनने आपल्या व्हिडिओ पोस्टला दिले आहे. फराह खाननेही एडसोबत एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. एका फोटोत फराह, एसआरके आणि एड एकत्र हसतमुखपणे फोटोसाठी पोज देताना दिसतात. "जेव्हा तुम्ही शाहरुख आणि एड शरीनसारख्याला दिग्दर्शित करता तेव्हा कुठंतरी जाऊन तुम्हाला असा फोटो काढता येऊ शकतो", अशा आशयाचे कॅप्शन फराहने पोस्टला दिले आहे.

गायक एड शीरन त्याच्या सहकाऱ्यांह सध्या आशिया दौऱ्यावर आला आहे. येत्या 16 मार्चला त्याचा मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानामध्ये इव्हेन्ट पार पडतोय. यासाठी संपूर्ण भारतातून तरुण चाहते मुंबईत दाखल होणार आहे. एड शीरनला ऐकण्यासाठी भारतीय फॅन्स उतावीळ झाल्याचं चित्र सध्या तरी तयार झालं आहे. शीरनच्या मुंबई भेटात तो अलिकडेच गायक अरमान मलिकला भेटला होता. गायक शीरन आपल्या मित्रांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. अरमानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो एडला काही डान्स मूव्हीज शिकवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो गायक शीरनला 2020 च्या 'आला वैकुंठपुररामुलू' चित्रपटातील 'बट्टा बोम्मा'ला स्टेप्स शिकवताना दिसत आहे. दरम्यान, मंगळवारी एडने अभिनेता आयुष्मान खुराना याचीही भेट घेतली होती. विशेष म्हणजे आयुष्मानने एड शीरनला त्याच्या आईने घरी बनवलेल्या पिन्नीची चव चाखायला दिली होती.

हेही वाचा -

  1. कबीर सिंगवर टीका करणाऱ्या किरण रावनं व्यक्त केली 'अ‍ॅनिमल' पाहण्याची इच्छा
  2. Katrina kaif latest Photo : कटरिना कैफच्या लेटेस्ट फोटोवर चाहत्यांनी केली कौतुकाचा वर्षाव
  3. Kiran Rao : '' आमिरचा पहिला घटस्फोट माझ्यामुळे झाला नव्हता'' : किरण रावचा मोठा खुलासा

Last Updated : Mar 14, 2024, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.