ETV Bharat / entertainment

शाहरुख खाननं सामंथा रुथ प्रभूबरोबर साईन केला आगामी चित्रपट - shah rukh khan signs next film - SHAH RUKH KHAN SIGNS NEXT FILM

Shah Rukh Khan : शाहरुख खान आणि सामंथा रुथ प्रभू एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे. आता याबद्दल सोशल मीडियावर बातम्या पसरल्या आहेत.

Shah Rukh Khan
शाहरुख खान (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 2:09 PM IST

मुंबई- Shah Rukh Khan : 'जवान'मधील बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि साऊथची अभिनेत्री नयनतारा यांची जोडी अनेकांना खूप आवडली होती. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडलं होतं. नयनतारानंतर शाहरुख खान आणखी एका साऊथ अभिनेत्रीबरोबर काम करण्यास तयार आहे. शाहरुखनं सामंथा रुथ प्रभूबरोबरचा एक चित्रपट साईन केल्याची बातमी आता समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, 'डंकी'नंतर शाहरुख पुन्हा एकदा राजकुमार हिरानीबरोबर काम करणार आहे. हा चित्रपट ॲक्शन-ॲडव्हेंचर आणि देशभक्तीपर असल्याचं बोललं जात आहे.

ॲक्शन पॅक चित्रपट : या चित्रपटाबद्दल आता काही माहिती समोर आलेली नाही. शाहरुख खान आणि सामंथा रुथ प्रभूबरोबरच्या चित्रपटाची बरीच वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान हा सामंथाचा पहिला आणि शाहरुख खानचा राजकुमार हिरानीबरोरचा दुसरा चित्रपट असेल. दोन्ही स्टार्स आणि चाहते अधिकृत घोषणेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा चित्रपट एक ॲक्शन-पॅक देशभक्तीपर चित्रपट असणार असल्याचं बोललं जात आहे. या आठवड्यात अधिक तपशील उघड होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान सामंथा रुथ प्रभू आणि शाहरुख खानचा हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

शाहरुख खान आणि सामंथा रुथ प्रभूचा आगामी चित्रपट : दरम्यान या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान शेवटी' डंकी' चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं होतं. या चित्रपटात त्याच्याबरोबर मुख्य भूमिकेत तापसी पन्नू दिसली होती. आता पुढं तो 'लॉयन' आणि 'जवान 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'जवान'च्या यशानंतर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. याशिवाय तो 'टायगर वर्सेस पठाण'मध्ये सलमान खानबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसेल. त्यांचा हा चित्रपट खूप चर्चेत आहेत. तसेच सामंथा रुथ प्रभूच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'सिटाडेल: हनी बन्नी' यात वरुण धवनबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नासाठी मनीषा कोईरालानं पाठवली खास भेटवस्तू - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING
  2. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'या' स्पर्धकांनी केली एंट्री, देवोलीना भट्टाचार्यनं 'हा' घेतला आक्षेप - bigg boss ott season 3
  3. आमिर खानचा मुलगा जुनैदनं 'महाराज' चित्रपटातून केलं पदार्पण, बहीण इरा आणि मेव्हणा नुपूरची प्रतिक्रिया - Maharaj release

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.