ETV Bharat / entertainment

शाहरुख खानची मालिका 'फौजी'चा सीक्वल 35 वर्षांनंतर घोषित, मोशन पोस्टर रिलीज...

'फौजी 2'ची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत विकी जैन आणि गौहर खान दिसणार आहेत. फोजी मालिका एकेकाळी शाहरुख खाननं गाजवली होती.

Fauji 2
फौजी 2 ('फौजी 2'ची घोषणा (Poster/IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 15, 2024, 2:08 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानची टीव्ही सीरियल 'फौजी' ही खूप लोकप्रिय झाली होती. शाहरुखला या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. 'फौजी' सारखी मालिका करून शाहरुख खान इतका मोठा स्टार बनेल असा, कोणीही, कधी विचार केला नव्हता. 'फौजी' ही मालिका 35 वर्षांपूर्वी प्रसारित झाली होती. आज 15 ऑक्टोबर रोजी 'फौजी 2'ची घोषणा करण्यात आली आहे. निर्माते संदीप सिंग 'फौजी 2' बनवणार आहेत. आता या मालिकेमधील स्टारकास्टाची देखील नावं समोर आली आहेत. चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी 'फौजी 2'साठी राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनबरोबर सहयोग केला आहे.

'फौजी 2'ची स्टार कास्ट : 'फौजी 2'मध्ये विकी जैन आणि गौहर खान हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'फौजी 2'मधून 12 कलाकार अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करणार आहेत. यात आशिष भारद्वाज, रुद्र सोनी, उत्कर्ष कोहली, अमरदीप फोगट, अयान मनचंदा, नील सतगुप्ता, सुवंश धर, प्रियांशू राजगुरू, अमन सिंग दीप, उदित कपूर, मानशी आणि सुष्मिता भंडारी या नवोदित अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय 'फौजी 2' मध्ये सोनू निगम आपला दमदार आवाज देणार आहे. या मालिकेत श्रेयस पुराणिक यांचं संगीत आणि शरद केळकर यांचा आवाज असेल. 'फौजी 2' ची निर्मिती संदीप सिंग, जफर मेहंदी, विकी जैन, आणि समीर हलीम करत आहेत.

'फौजी 2' कुठे होणार प्रसारित : या मालिकेचं दिग्दर्शन अभिनव पारीक करणार आहे. याआधी अभिनव यांनी 'सब मोह माया है' आणि 'ए वेडिंग स्टोरी' हे चित्रपट बनवले आहेत. हा शो दूरदर्शनवर प्रसारित होणार आहे. आता या मालिकेत शाहरुख खान असेल की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान 'फौजी' ही मालिका 1989 साली दूरदर्शनवर प्रसारित झाला होती, यात शाहरुख खाननं अभिमन्यू राय नावाच्या कनिष्ठ सैनिकाची भूमिका साकारली होती. 'किंग खान'नं 1988 मध्ये टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला होता. शाहरुखचा पहिला चित्रपट 'दीवाना' 1992 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. यानंतर शाहरुख खाननं कधीच मागे वळून पाहिलं नाही. टीव्हीपासून सुरुवात केल्यानंतर शाहरुखनं आपली ओळख जगभरात निर्माण केली आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खानला आयफा 2024मध्ये आर्यन खानच्या अटकेचे दिवस आठवले, म्हणाला- 'टफ टाइम' - IIFA 2024
  2. आयफा अवॉर्ड्स 2024 : शाहरुख खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर राणी मुखर्जी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - IIFA 2024 Winners Full List
  3. आयफा अवॉर्ड 2024 साठी शाहरुख खान अबु धाबीत दाखल, 'द किंग'च्या डॅशिंग लूकवर फॅन्स फिदा - SRK arrives in Abu Dhabi for IIFA

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.