मुंबई Shah Rukh Khan Meets Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं 12 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दीपिका पदुकोण आणि तिच्या नवजात बालिकेची बाळाची भेट घेतली. अलीकडेच दीपिका आणि पती रणवीर सिंगनं त्यांचं पहिलं, कन्यारत्नाचं स्वागत केलं. शाहरुख खानच्या आधी मुकेश अंबानी यांनी नवजात बालिकेची भेट घेतली होती. गेल्या गुरुवारी पापाराझींनी शाहरुख खानची कार एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलबाहेर पाहिली. शाहरुखनं आपल्या व्यग्र शेड्यूलमधून बाळाला भेटण्यासाठी वेळ काढला.
शाहरुख खाननं घेतली दीपिकाच्या बाळाची भेट : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 'किंग खान'नं त्याच्या कारच्या चारही बाजूंनी पडदे लावले. आता सोशल मीडियावर शाहरुख जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "दीपिकाची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे का?" दुसऱ्या एकानं लिहिलं, "दीपिका किती दिवसांपासून रुग्णालयात आहे, सर्व ठीक आहे का ?" आणखी एकानं लिहिलं, "खूप चांगला मित्र आणि व्यक्ती आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून शाहरुखवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाला तिच्या छोट्या राजकुमारीसह लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. रणवीर आपल्या पत्नी आणि मुलीचं घरी भव्य स्वागत करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपं त्यांच्या मुलासाठी नो-फोटो धोरणांचं पालन करतील.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचे चित्रपट : दरम्यान शाहरुख खान स्टारर 'ओम शांती ओम' (२००७) मधून दीपिका पदुकोणनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर दीपिकाचं 'किंग खान'बरोबरचं नातं आणखी घट्ट झालं. 'ओम शांती ओम' व्यतिरिक्त दीपिका पदुकोणनं शाहरुखबरोबर 'हॅप्पी न्यू इयर', 'चेन्नई एक्सप्रेस' 'जवान', 'पठाण' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनेकदा स्क्रीन शेअर केली आहे. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूप जबरदस्त आहे. याशिवाय त्यांचं ऑफ-स्क्रीन नातंही अतूट आहे. दोघंही शेवटी 'जवान' चित्रपटामध्ये एकत्र दिसले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
हेही वाचा :
- राणा दग्गुबतीनं केला शाहरुख खानच्या पायाला स्पर्श; आता व्हिडिओ होत आहे व्हायरल - Shah Rukh khan Rana Daggubati
- शाहरुख खाननं भरला सर्वाधिक कर, कपिल शर्मानं अल्लू अर्जुनला टाकले मागे - shah rukh khan
- 77व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खाननं सुजॉय घोषच्या 'किंग'बद्दल केलं भाष्य - shah rukh khan New movie