मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खान 2 नोव्हेंबरला त्याचा 59वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आधीच सेलिब्रेशनचे वातावरण आता निर्माण केले आहे. वाढदिवसापूर्वी शाहरुख खान त्याच्या मुलाच्या कंपनीमधील एका कार्यक्रमासाठी कुटुंबासह दुबईला पोहोचला. या कार्यक्रमात शाहरुख खाननं कुटुंबाबरोबर स्टेजवर मनमोकळेपणाने एन्जॉय केला. दुबईतील या कार्यक्रमातील शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो आपल्या सासूबरोबर डान्स करताना दिसत आहे. या कार्यक्रमात शाहरुख खानची सासू सविता छिब्बर, गौरी खान, आर्यन खान, सुहाना खान देखील उपस्थित आहेत.
शाहरुख खाननं केला धमाकेदार डान्स : शाहरुख खान दुबई इव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्टेजवर 'झूमे जो पठान'वर सासू सविता छिब्बरबरोबर हात धरून डान्स करताना दिसला. दरम्यान, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख खान मुलगी सुहाना खानबरोबर धमाल करताना दिसत आहे. दरम्यान शाहरुख खान आणि त्याचा सासूचा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओ अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याशिवाय या कार्यक्रमात शाहरुखनं आपल्या अनेक चाहत्यांबरोबर देखील फोटो क्लिक केले आहेत. आता त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपट 'किंग'ची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
King Khan dancing with his mother in law, such a sweet moment ❤#ShahRukhKhan pic.twitter.com/b9aNX573pD
— Riyaz (@RiyazSrkian) October 28, 2024
💫 Shah Rukh Khan in Gray Hair Look for #King
— MJ Cartels (@Mjcartels) October 28, 2024
- He's Agent Assassin #ShahRukhKhan #PATHAAN #Jawan #Dunki#War2 #HrithikRoshan#JrNTR #Bollywood pic.twitter.com/xID2AmMxDY
SRK greets the crowd, blows flying kisses, and strikes his iconic pose that the world adores! ♥️✨@iamsrk#ShahRukhKhan #SRK #KingKhan #DYAVOLAfterDarkDXB #Dyavol #Dubai pic.twitter.com/weXmeKUlu9
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) October 27, 2024
Shah Rukh Khan 's Aura is next level ffs. VERA LEVEL 🔥 #ShahRukhKhan pic.twitter.com/MTfZsIINE1
— ℣ (@Vamp_Combatant) October 27, 2024
HQ Video of SRK in Dubai and
— MgSak18 (@mdgolam_sakir) October 27, 2024
The Salt - Pepper Look of Him
🥵🔥❤️🔥#ShahRukhKhan #King pic.twitter.com/JcBBQViDoX
शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट : 'किंग' चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील असणार आहे. ती पहिल्यांदाच आपल्या वडीलांबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसेल. त्याचबरोबर या चित्रपटात शाहरुख खान आणि सुहाना खानसह अभिषेक बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'किंग' चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहे. शाहरुख खानचा ॲक्शन थ्रिलर 'किंग' 2026 च्या ईदला प्रदर्शित होऊ शकतो आहे. सुरुवातीला हा चित्रपट 2025 च्या रिलीजसाठी नियोजित केला गेला होता, मात्र शाहरुखचे शेड्यूल व्यग्र असल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2025 पर्यंत ढकलले आहे. दरम्यान शाहरुखचा पुढं 'जवान 2' आणि 'लॉयन ' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :