ETV Bharat / entertainment

फोर्ब्स 2024 च्या यादीनुसार सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय स्टार्स - shah rukh khan and deepika padukone

Highest Paid Actor of 2024 : फोर्ब्सच्या यादीनुसार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण सर्वाधिक मानधन घेणारे स्टार्स बनले आहेत. याशिवाय या यादीत टॉप पाचमध्ये किती कलाकार याबद्दल जाणून घ्या...

Highest Paid Actor of 2024
सर्वाधिक मानधन घेणारे स्टार्स 2024 (फोर्ब्स 2024 (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 2:30 PM IST

मुंबई - Highest Paid Actor of 2024 : हिंदी चित्रपटसृष्टीतील शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपटसृष्टीत कमाईच्या बाबतीत सर्वांना मागे टाकलं आहे. हे दोघेही 2024मधील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेत असून येत्या सप्टेंबर महिन्यात ती आई होणार आहे. या गोड बातमीपूर्वी दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दीपिका कमाईच्या बाबतीत खूप पुढे गेली आहे. तिनं कमाईत आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि ऐश्वर्या रॉय यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

दीपिका पदुकोणची फी : आयएमडीबी आणि फोर्ब्सच्या यादीनुसार, दीपिका एका चित्रपटासाठी फी 15 ते 30 कोटी रुपये घेते. ही फी अभिनेत्रीच्या बाबतीत खूप जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर कंगना राणौत असून ती 15 ते 27 कोटी रुपये मानधन एका चित्रपटासाठी घेते. यानंतर प्रियांका चोप्रा तिसऱ्या स्थानावर आहे. ती एका चित्रपटासाठी 15 ते 25 कोटी रुपये घेते. यादीत चौथ्या स्थानावर कतरिना कैफ ही 15 ते 20 कोटी रुपये मानधन घेते. आलिया या यादीत पाचव्या क्रमांकावर असून ती एका चित्रपटासाठी 10 ते 20 कोटी रुपये फी घेते. याशिवाय करीना कपूर खान ही 8 ते 18 कोटी, श्रद्धा कपूर 7 ते 15 कोटी, विद्या बालन 8 ते 14 कोटी, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय 8 ते 12 कोटी चार्ज करतात.

शाहरुख खान फी : शाहरुख खाननं कमाईच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे. फोर्ब्स आणि आयएमडीबीच्या आकडेवारीनुसार, शाहरुख खान 150 ते 250 कोटी, रजनीकांत 150 ते 210 कोटी, थलपथी विजय 130 ते 200 कोटी, प्रभास 100 ते 200 कोटी आणि पाचव्या क्रमांकावर आमिर खान 100 ते 175 कोटी चार्ज करतो. सलमान खान 100 ते 150 कोटी, कमल हासन 100 ते 150 कोटी, अल्लू अर्जुन 100 ते 125 कोटी मानधन घेतात. 10 व्या क्रमांकावर अक्षय कुमार आहे. तो एका चित्रपटासाठी 60 ते 145 कोटी रुपये घेतो. त्यानंतर साऊथचा सुपरस्टार अजित 105 कोटी घेतो. ईटीव्ही इंडिया या कमाईच्या आकड्यांची पुष्टी करत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार स्टार्सची नेट वर्थ

शाहरुख खान- 6300 कोटी

आमिर खान - 1862 कोटी

सलमान खान - 2900 कोटी

अक्षय कुमार- 2500 कोटी

रजनीकांत - 430 कोटी

थलपथी विजय - 474 कोटी

प्रभास - 348.55 कोटी

हेही वाचा :

  1. नागा चैतन्यनं पोस्ट केलेल्या वडील नागार्जुनच्या थ्रोबॅक फोटोवर तब्बूची प्रतिक्रिया - tabu reaction
  2. 'पुष्पा 2' रिलीज पुढे ढकल्यानं चाहते नाराज, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांच्या संयमाची सत्वपरीक्षा - Pushpa 2 The Rule Postponed
  3. उर्वशी रौतेला अभिनीत 'जेएनयू'चा ट्रेलर पाहून युजर्स भडकले - Jahangir National University
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.