मुंबई -Sara Ali Khan 29th Birthday: अभिनेत्री सारा अली खान 12 ऑगस्ट रोजी 29 वर्षांची झाली. आता तिनं तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. 12 ऑगस्ट रोजी रात्री, सारानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "आनंद, आनंद आणि कृतज्ञता. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद." शेअर केलेल्या फोटोमध्ये सारा ही पांढऱ्या पारंपारिक पोशाखात असून ती गणपतीच्या सुंदर सजवलेल्या मूर्तीशेजारी बसलेली आहे. तिची रुम रंगीबेरंगी फुलांनी सजलेली फोटोत दिसत आहे. दुसऱ्या फोटोत सारा ही एका मुलाबरोबर दिसत आहे. या फोटोमध्ये तो मुलगा साराला वाढदिवसाचे कार्ड देत आहे. हे गिफ्ट मिळाल्यानंतर सारा खूप खूश आहे.
सारा अली खानचा वाढदिवस : याशिवाय एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे, यामध्ये साराच्या केक कटिंग करत आहे. व्हिडिओत सारानं पांढरा आणि गुलाबी रंगसंगतीचा सूट परिधान केला आहे. दरम्यान व्हिडिओत केकवरील मेणबत्ती जळताच सारा घाबरून मागे सरकत असल्याचं दिसत आहे. मेणबत्त्या विझवताना तिचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. साराच्या साध्या पोशाखामुळे तिचे चाहते सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. याशिवाय अनेकजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच काहीजण तिच्या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
इब्राहिम खाननं बहीण साराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : सारा अली खानचा भाऊ इब्राहिमनं आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या सोशल मीडियाच्या माध्यामातून दिल्या आहेत. इब्राहिमनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर साराबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, "सर्वोत्तम बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लव्ह यू अप्पा जान'. करीना कपूर खान, सोहा अली खान, अनन्या पांडे, विकी कौशल, आयुष्मान खुराना, कार्तिक आर्यन, विकी कौशल, रकुल प्रीत सिंग यांसारख्या अनेक स्टार्सनीही साराच्या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'लुका चुप्पी 2' आणि 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- ड्रेसवर ज्यूस सांडल्यानंतर एअर होस्टेसवर भडकली सारा अली खान, व्हिडिओ व्हायरल - sara ali khans video viral
- कार्तिक आर्यननं सारा अली, कियाराला नाही तर विद्या बालनला म्हटलं 'फेव्हरेट' अभिनेत्री - Kartik Aaryan Favourite Co Star
- करण जोहरच्या आगामी चित्रपटात आयुष्मान आणि साराची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार - AYUSHMANN AND SARA ALI KHAN