मुंबई - Vijay Raaz Son of Sardaar 2 : अभिनेता अजय देवगण स्टारर 'सन ऑफ सरदार 2' कॉमेडी ड्रामा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात 6 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. संजय दत्तला यूकेचा व्हिसा न मिळाल्यानं यूकेच्या शेड्युलमधून बाहेर पडावं लागलं होतं. दरम्यान 'सन ऑफ सरदार 2' बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विजय राजची देखील महत्वाची भूमिका होती. दरम्यान त्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता त्याच्या जागी अभिनेता संजय मिश्रा या चित्रपटामध्ये एंट्री घेणार असल्याचं समजत आहे.
विजय राजला 'सन ऑफ सरदार 2'मधून काढले बाहेर : मिळालेल्या माहितीनुसार 'सन ऑफ सरदार 2 'च्या सेटवर विजय राजनं अजय देवगणला नमस्कार केला नाही आणि त्याच्या विचित्र वागणुकीमुळे त्याला चित्रपटातून बाहेर काढण्यात आलं. विजयनं चित्रपटातून एक्झिट होण्यामागचं कारण, स्पॉट बॉयबरोबर लैंगिक छळ केल्याचं म्हटलं जात आहे. विजय राजनं केलेल्या दाव्यानुसार त्यानं अजय देवगणला नमस्ते न बोलल्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणावर अजय देवगण आणि 'सन ऑफ सरदार 2'च्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या चित्रपटाचे सहनिर्माते कुमार मंगत यांनी मुलाखतीत याप्रकरणी खुलासा केला आहे.
निर्माते कुमार मंगतनं केला खुलासा : कुमार मंगत यांनी विजय राज चित्रपटातून बाहेर पडण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विजय राजला चित्रपटातून काढण्याचं कारण, त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्याची वाढती मागणी, ज्यात व्हॅनिटी व्हॅन, प्रीमियम स्वीट्स (लक्झरी रूम्स)चा समावेश होता. कुमार मंगत यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी विजय राजला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं काहीही ऐकून घेतलं नाही. यानंतर विजयनं सेटवर गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि 3 लोकांच्या स्टाफसाठी 2 कारची मागणी केली. 'सन ऑफ सरदार 2'ची शूटिंग यूकेमध्ये सुरू आहे. जेव्हा विजय तिथे सेटवर आला, तेव्हा रवि किशन आशिष आणि चित्रपटाचे निर्माते त्यांना भेटला. 30 मिनिटे संभाषणात, 25 मीटर अंतरावर उभा असलेला चित्रपटाचा मुख्य अभिनेता अजय देवगणला तो भेटला नाही, ज्यामुळे त्याला चित्रपट सोडण्यास सांगण्यात आलं, असं देखील म्हटलं जात आहे. यामधील कुठलं कारण सत्य आहे, हे काही दिवसात कळेल.
हेही वाचा :
- अजय देवगणनं 'सन ऑफ सरदार 2'च्या शूटिंगला केली सुरुवात, मृणाल ठाकूरचा फर्स्ट लूक आला समोर - Sardaar 2 shoot First Look
- अजय देवगण आणि मृणाल ठाकूर स्टारर 'सन ऑफ सरदार 2'मध्ये दिसणार 11 मोठे कलाकार - Ajay Devgan and Mrunal Thakur
- अजय देवगण स्टारर 'सन ऑफ सरदार 2'मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री... - mrunal thakur