मुंबई - SLB Period Action Drama: प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली असून ती ज्या ठिकाणांना भेट देत आहे तिथं ती चर्चेत राहात असते. तिनं आपल्या कुटुंबासह अनेक स्थळांना भेटी दिल्या. अलिकडेच तिने अयोध्येतील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. लेटेस्ट चर्चेतून असं कळतंय की प्रियांका आगामी काळात संजय लीला भन्साळी यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. भन्साळी यांनी तिच्यासाठी एक अॅक्शन पीरियड ड्रामा सादर करण्याचं ठरवलंय. यापूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या 'मेरी कॉम', 'गोलियों की रासलीला राम-लीला' आणि 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात प्रियांकाने काम केले होते. आता ही जोडी चौथ्यांदा एकत्र येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी एका अॅक्शन-पॅक्ड चित्रपटासाठी प्रियांकाबरोबर चर्चा करत आहेत. याबाबत सांगोपांग विचार करुन हा प्रोजेक्ट स्वीकारण्यास ती उत्सुक झाली आहे. ती ज्या प्रोजेक्टवर विचार करत आहे त्यापैकी एक म्हणजे भन्साळींसोबतचा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे जो वेगळ्या काळात सेट केला जाईल.
हाती आलेल्या बातमीनुसार प्रियांका नव्या प्रोजेक्टची संकल्पना समजून घेण्यात रस दाखवत आहे. सध्या ती शूटिंगचे वेळापत्रक आणि वेशभूषा यासारख्या तपशीलांवर भन्साळींच्या बरोबर चर्चा करत आहे. विशेष म्हणजे, भन्साळी दुसऱ्या एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्यात गुंतले आहेत. त्यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट 2025 च्या ख्रिसमसमध्ये पडद्यावर येणार आहे. यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांचा अभिनय पाहायला मिळेल.
भारताच्या दौऱ्यावर असलेल्या प्रियांकाला इथल्या फिल्म इंडस्ट्रीत पुनरागमन करायचं आहे. यासाठी योग्य चित्रपटाच्या निवडीसाठी ती प्रयत्नशील आहे. तिने यापूर्वी तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाची निर्मिती करुन एक नवा पायंडा तयार केला आहे. भारतीय प्रदेशिक भाषांच्यामध्ये चित्रपट निर्मितीचे मोठं ध्येय तिनं समोर ठेवलंय. त्यामुळे भारताच्या दौऱ्यात वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये सहभागी होण्याबरोबरच प्रियांका तिच्या प्रॉडक्शन हाऊसवर लक्ष केंद्रित करत आहे. तिच्या बॅनरखाली आगामी प्रकल्पांना अंतिम रूप देण्यासाठी ती लोकांना भेटत आहे.
तिच्या अलीकडील कामाच्या आघाडीवर, प्रियांका अखेरीस 'लव्ह अगेन' चित्रपट आणि 'सिटाडेल' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्यासह फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या आगामी चित्रपटात ती भूमिका करणार अशी खूप काळापासूनची चर्चा आहे. याव्यतिरिक्त, तिने अकादमी पुरस्कार नामांकित माहितीपट 'टू किल अ टायगर'साठी कार्यकारी निर्मात्याची भूमिका स्वीकारली आहे. तिने अजितेश शर्मा दिग्दर्शित 'वुमन ऑफ माय बिलियन्स'ची निर्मिती करण्यासाठी अवेडेशियस ओरिजिनल्सशी भागीदारी केली आहे.
हेही वाचा -
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाला एका महिना पूर्ण; शेअर केला व्हिडिओ - Rakul and Jackky