मुंबई - Sanjay dutt : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजय दत्त 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हरियाणामधून निवडणूक लढवणार असल्याच्या अनेक दिवसांपासून अफवा पसरल्या होत्या. आता याबद्दल एक खुलासा झाला आहे. संजय दत्तनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं राजकारणात जात नसल्याचं सांगितलं आहे. संजय दत्तचे वडील आणि अभिनेता सुनील दत्त मुंबईचे खासदार आणि मंत्री राहिले आहेत. याशिवाय संजय दत्तचं हरियाणाशी खास नातं आहे. संजयचं हरियाणातील यमुनानगर येथे वडिलोपार्जित घर आहे. त्यामुळे तो इथून निवडणूक लढवणार असा अनेकजण अंदाज लावत होते.
संजय दत्तनं शेअर केली पोस्ट : संजय दत्तनं राजकारणात येण्याच्या अफवांवर स्पष्टीकरण देत पोस्टमध्ये लिहिलं, ''मला राजकारणात येण्याच्या सर्व अफवा संपवायची आहेत. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाही किंवा निवडणूक लढवत नाही. जर मी राजकीय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असता, तर मी पहिल्यांदाच त्याची घोषणा केली असती. कृपया अफवा पसरवणे थांबवा.'' संजय दत्तचे वडील काँग्रेस पक्षामध्ये होते. याशिवाय त्याची बहिण प्रिया दत्त या देखील खासदार राहिल्या आहेत. हरियाणाच्या कर्नाल जागेवर काँग्रेसला भाजपविरोधात मजबूत उमेदवार उभा करायचा आहे. यामुळे संजय दत्तचे नाव चर्चेत होतं. याशिवाय तो अभय सिंह चौटाला यांच्या प्रचारासाठी अनेकवेळा हरियाणामध्ये आला होता. मात्र, आता खुद्द त्यानं अशा सर्व बातम्या फेटाळून लावले आहेत.
वर्कफ्रंट संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'द व्हर्जिन ट्री' आणि 'वेलकम टू द जंगल' या हॉरर कॉमेडी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'वेलकम टू द जंगल' 20 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अक्षय कुमार, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, श्रेयस तळपदे, लारा दत्ता, रवीना टंडन, सुनील शेट्टी , जॉनी लिव्हर, दलेर मेहंदी, कृष्णा अभिषेक आणि इतर कलाकर दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहे.
हेही वाचा :