मुंबई - Pushpa 2: चाहते अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा पहिला भाग इतका हिट झाला होता की, आता प्रत्येकजण त्याच्या दुसऱ्या भागाकडून खूप अपेक्षा करत आहेत. अल्लू अर्जुनबरोबर 'पुष्पा 2' चित्रपटात रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची क्रेझ खूप आहे. 'पुष्पा 2' चित्रपटात आता हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता संजय दत्त देखील दिसणार असल्याचं समजत आहे. 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी संजू बाबाला या चित्रपटात एंट्री दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्त 'पुष्पा 2'मध्ये कॅमिओ करणार आहे. संजयची व्यक्तिरेखा खूप प्रभावशाली असणार आहे. सध्या निर्मात्यांनी संजय दत्तच्या व्यक्तिरेखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
'पुष्पा 2'मध्ये संजय दत्तची एंट्री : 'पुष्पा'चे दिग्दर्शक सुकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टारला चित्रपटात सामील करण्याचा निर्णय घेतला होता. एका रिपोर्टनुसार मनोज बाजपेयीला 'पुष्पा 2' साठी अप्रोच करण्यात आल्याचं बोललं जात होतं. नंतर खुद्द मनोज बाजपेयी यांनी ही बातमी चुकीची असल्याचं सांगितलं होतं. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइस' 2021 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील गाणी जगभर हिट झाली होती. आता 'पुष्पा 2' ची रिलीज डेट देखील समोर आली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अजय देवगणचा 'सिंघम अगेन' देखील रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होताना दिसेल.
अल्लू अर्जुनचा लूक व्हायरल : 'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा लूक समोर आला आहे. यामध्ये तो साडी नेसलेला दिसत होता आणि त्याचा चेहरा निळ्या-लाल रंगानं रंगविण्यात आला आहे. त्याचा हा लूक प्रचंड वेगळा दिसत आहे. अल्लू अर्जुनचा हा लूक त्याच्या चाहत्यांना पसंत पडला आहे. 'पुष्पा 2' मधील फहद फासिलचा लूक देखील समोर आला आहे. आता चाहत्यांना रश्मिका मंदान्नाच्या लूकची प्रतीक्षा आहे. रश्मिका या चित्रपटात कशी दिसणार हे चाहत्यांना बघायचे आहे. 'पुष्पा' चित्रपटासाठी अल्लू अर्जुननं बेस्ट अॅक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकला आहे. या चित्रपटाची कहाणी यावेळी देखील हटके असणार असा अंदाज अनेकजण लावत आहेत.
हेही वाचा :