मुंबई : आजकाल आपल्या काही विचित्र गोष्टी ऐकायला येतात. आता एक अशी एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली. बॉलिवूडमध्ये अनेक असे काही प्रसिद्ध नामांकित व्यक्ती आहेत, ज्यांनी लिंग परिवर्तन करून स्वत:ला स्त्रीमध्ये बदलविले आहेत. दरम्यान माजी भारतीय खेळाडू संजय बांगरचा मुलगा आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यानं त्याचे हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन शेअर केले आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर तो लिंग बदलवून मुलगी झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत त्याला 10 महिन्याचा प्रवास करावा लागला. आता शस्त्रक्रियेनंतर आर्यन अनाया बनला आहे. त्यानं आपले काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आर्यन बांगर हा देखील त्याच्या वडिलांसारखा क्रिकेटपटू आहे. त्याला देखील खेळण्यात रस आहे. सध्या तो स्थानिक क्लबकडून खेळतो. आर्यन हा मुलगी झाल्यानं अनेकांना आश्चर्य झालं आहे.
संजय बांगरचा मुलगा आर्यन झाला मुलगी : याशिवाय आर्यनचं नवीन अवतार हे अनेकांना आवडत आहेत. काहीजण त्यानं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट्स करून, त्याला सुंदर असल्याचं म्हणत आहेत. दरम्यान आर्यन हा अनया झाल्यानंतर त्यानं आपला आनंद व्यक्त करत इन्स्टा पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी अनेक त्याग केले आहेत. पण या खेळाशिवाय, एक प्रवास देखील आहे, जो माझ्या स्वतःच्या शोधाशी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील विजय माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे. मात्र, काही वेळानं त्यानं त्याची इन्स्टा पोस्ट डिलीट केली. या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रक्रिया दिल्या होत्या. संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर, आता अनया बांगर झाली आहे.
आर्यनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : अनाया सध्या इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहते. अनायाच्या इंस्टाग्राम रीलवरून असं दिसून येत की, तिनं क्लबसाठी खेळताना 145 धावा केल्या आहेत. सध्या आर्यन मुलाकडून मुलीत परिवर्तन झालेले हा चर्चेचा विषय बनला आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये देखील अनेक अभिनेत्यांनी स्वत:ला स्त्रीमध्ये परिवर्तन केलं आहे. यामध्ये स्वप्निल शिंदे (सायशा ), गौरव अरोरा (गौरी), पंकज शर्मा (बॉबी डार्लिंग ), गजल धालीवाल, निक्की चावला यांचा समावेश आहेत. या स्टार्सनं देखील हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन करून स्वत:ला स्त्रीचं रुप दिलंय. आता हे स्टार्स देखील आपल्या परिवर्तनामुळे आनंदी आहेत.
1 स्वप्निल शिंदे (साईशा ) : साईशा शिंदे, ज्याला पूर्वी स्वप्नील शिंदे म्हणून ओळखले जात होते. त्यानं अनेकदा स्त्री बनण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. 'बिग बॉस' शोदरम्यान देखील त्यानं त्याच्या स्त्री बनण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. साईशा शिंदे ही संस्थापक आणि डिझायनर म्हणून काम करते. फॅशनच्या दुनियेत तिचं नाव प्रसिद्ध आहे.
2 पंकज शर्मा (बॉबी डार्लिंग) : दिल्लीचा रहिवासी 'बॉबी डार्लिंग'चा जन्म 'पंकज शर्मा' म्हणून झाला. बॉबीला वयाच्या 15व्या वर्षी समजले की तो पुरुष असला तरी त्याच्या आत कुठेतरी एक स्त्री आहे. बॉबीनं हे वडिलांना सांगितल्यावर त्यांनी त्याला घराबाहेर हाकलून दिले होते. यानंतर त्यानं लिंग बदलविण्याचा निर्णय घेतला होता.
3 गौरव अरोरा (गौरी) : स्पिटविला रिॲलिटी शो स्पर्धक गौरव अरोरानं त्याचे लिंग बदलून गौरी अरोरामध्ये रूपांतरित केलं होतं. गौरी अरोरानं अनेकदा तिच्या जीवनाबद्दल प्रवास शेअर केला आहे. गौरीमध्ये आश्चर्यकारक रूपांतर झाल्यानं तिला 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल'मध्ये स्थान मिळाले आहे.
4 गजल धालीवाल : गझल धालीवाल ही एक लेखक आहे, मात्र ती आधी एक मुलगा होती. यानंतर तिनं लिंग परिवर्तन करून स्त्रीचं रुप धारण केलं. तिनं विनोद चोप्राचा चित्रपट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' याचे संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत राजकुमार राव, अनिल कपूर आणि सोनम कपूर हे कलाकार होते.
5 निक्की चावला : देशातील पहिली ट्रान्ससेक्शुअल मॉडेल-अभिनेत्री निक्की चावलाचा जन्म मुलाच्या रुपात झाला होता. लहानपणापासूनच ती मुलगी आहे असे तिला वाटायचे. काही वर्षांनी ती लैंगिक ऑपरेशनद्वारे मुलगी झाली. 'इमोशनल अत्याचार' आणि 'एस ऑफ स्पेस' सारखे रिॲलिटी शो करणारी पहिली ट्रान्सजेंडर मॉडेल ती बनली.