ETV Bharat / entertainment

सलमान खान वाय प्लस सिक्युरिटीमध्ये करणार 'सिकंदर'ची शूटिंग - salman khan y plus security team - SALMAN KHAN Y PLUS SECURITY TEAM

Salman Khan Y plus Security Team : सलमान खान हा वाय प्लस सिक्युरिटीमध्ये 'सिकंदर'ची शूटिंग करणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या टप्यातील शूटिंग मुंबई आणि हैदराबादमध्ये होईल.

Salman Khan Y plus Security Team
सलमान खान वाय प्लस सिक्युरिटी टीम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 5:38 PM IST

मुंबई - Salman Khan Y plus Security Team : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. अलीकडेच 'भाईजान'च्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, या प्रकरणी दोन आरोपींना मुंबई पोलिसांची ताब्यात घेतलं होतं. आता दुसरीकडे सलमान घरातून बाहेर पडला असून तो कडक सुरक्षेत काम करताना दिसत आहे. सध्या सलमान हा आगामी 'सिकंदर' चित्रपटच्या शुटिंगसाठी सज्ज झाला आहे. गेल्या ईदला 'भाईजान'नं त्याच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली होती. दरम्यान 'सिकंदर'बाबत बातमी आहे की, सलमान हा कडक सुरक्षेत या चित्रपटाची शूटिंग करणार आहे.

सलमान खान करणार 'सिकंदर' शूटिंग : रिपोर्ट्सनुसार, सलमान खान पुढच्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सलमान खान हा वाय प्लस सिक्युरिटीमध्ये त्याच्या चित्रपटाची शूटिंग करणार असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर सलमान जिथे जिथे या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सलमान खानची सुरक्षा टीम तो सेटवर पोहोचण्याच्या 10 दिवस आधी नजर ठेवण्यासाठी जाणार आहे. यावेळी ही सुरक्षा टीम सेटवरचा प्रत्येक कोपरा चेक करणार आहे. सलमान, ज्या ठिकाणी जाईल त्याबद्दलची विशेष माहिती काही अधिकाऱ्यांना असणार आहे.

कियारा अडवाणी होणार सिकंदरची राणी? : 'सिकंदर' या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन काम सुरू होणार आहे. दरम्यान सलमान खान हा मुंबई आणि हैदराबादमध्ये 'सिकंदर' चित्रपटाची शूटिंग करणार आहे. नुकतीच कियारा अडवाणीला चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांच्या कार्यालयात दिसली होती, त्यानंतर कियारा अडवाणी या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री असेल असं बोललं जात आहे, मात्र सिकंदरच्या निर्मात्यांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 'गजनी' दिग्दर्शक एआर मुरुगादास 'सिकंदर' हा चित्रपट बनवत आहेत, जो 2025 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'इन्शाअल्लाह', 'वॉन्टेड 2', 'नो एन्ट्री 2', 'किक 2' आणि 'दबंग 4' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. सोनू सूदच्या पाया पडली महिला चाहती, फोटो व्हायरल - Sonu Sood
  2. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजानं मुलांसह अयोध्येत घेतलं श्रीरामाचं दर्शन, फोटो व्हायरल - riteish and genelia visit ayodhya
  3. रजनीकांत आणि नागार्जुन एकाच चित्रपटात झळकणार? 'थलायवर 171'च्या शीर्षक लॉन्चपूर्वी चर्चेला उधाण - Thalavar 171

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.