ETV Bharat / entertainment

करण जोहरच्या 'द बुल' चित्रपटाची शूटिंग डेट न ठरल्यानं सलमान खाननं घेतला मोठा निर्णय - salman khan - SALMAN KHAN

Salman Khan Left The Bull: करण जोहरचा 'द बुल' हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. या चित्रपटातून सलमान खान हा बाहेर पडल्याची बातमी आता समोर आली आहे.

Salman Khan Left The Bull
सलमान खाननं द बुल सोडला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 2:58 PM IST

मुंबई Salman Khan Left The Bull : अभिनेता सलमान खान आणि निर्माता करण जोहर 25 वर्षांनंतर 'द बुल' या चित्रपटातून एकत्र काम करणार होते. या चित्रपटासाठी सलमान खूप मेहनत करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता 'द बुल'बाबत एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची शूटिंग गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार होती. अनेकदा शूटिंगची डेट पुढं ढकलण्यात आली. दरम्यान करण जोहरच्या या ॲक्शन चित्रपटातून सलमान खाननं माघार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सलमाननं हा चित्रपट का सोडला, यामागचं आता खर कारण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार करण जोहरनं सलमानला जुलैपर्यंत मुदतवाढ मागितली होती.

सलमान खाननं करण जोहरचा चित्रपट सोडला : करण जोहर आणि दिग्दर्शक विष्णुवर्धन अजूनही शूटिंगची योग्य डेट ठरवू शकले नाहीत. तसेच सलमानकडं साजिद नाडियादवाला आणि एआर मुरुगादॉस यांच्याबरोबरचा आगामी प्रोजेक्ट देखील आहे, ज्याचं शूटिंग मे 2024 मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे 'भाईजान'नं करणच्या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 'द बुल' चित्रपटामध्ये तो ब्रिगेडियर फारुख बुलसाराची भूमिका साकारणार होता, ज्यासाठी त्यानं निमलष्करी दलांबरोबर प्रशिक्षणही घेत होतं. याशिवाय त्यानं आपल्या आहारातही किरकोळ बदल केला होता. 'द बुल' चित्रपट हा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. सलमान खान मे महिन्यात साजिद नाडियादवालाच्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र असणार आहे.

सलमान खानचा वर्क फ्रंट : सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटी 'टायगर 3'मध्ये दिसला होता, जो दिवाळी 2023 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर कतरिना कैफ दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला. आता पुढं तो 'किक 2', 'दबंग 4' आणि 'टायगर व्हर्सेस पठाण' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय मुरुगादास आणि साजिद नाडियादवाला यांच्याबरोबरच्या एका चित्रपटात तो दिसणार आहे. हा चित्रपट 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होऊ शकतो.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये रणबीर कपूर केला खुलासा ; 'या' कारणामुळे वडील ऋषी कपूरनं होतं फटकारलं - the Great Indian Kapil Show
  2. 'देसी गर्ल' प्रियांकाच्या पती निकनं सर्वांना शांत राहण्याची केली सूचना, मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल - priyanka chopra
  3. लंडनमधील होप गालामध्ये आलिया भट्टनं गायलं सुंदर गाणं, व्हिडिओ व्हायरल - Alia bhatt

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.