ETV Bharat / entertainment

'सिकंदर'च्या अ‍ॅक्शन सीनसाठी सलमान खान सज्ज, या दिवसापासून सुरू करणार शूटिंग - Salman Khan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 4:53 PM IST

Salman Khan : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या तयारीत आहे. सुपरस्टार लवकरच या चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग सुरू करणार असल्याची माहिती आहे.

Salman Khan
सलमान खान (सलमान खान (फाइल फोटो) (IANS))

मुंबई - Salman Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान 'टायगर 3' या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये अखेरचा दिसला होता. तो 18 जूनपासून 'सिकंदर' या त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करत आहेत. त्यांनी आमिर खान स्टारर 'गजनी' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. शूटिंगची सुरुवात मुंबईत एरियल अ‍ॅक्शन सीक्वेन्सनं होणार आहे. या सीनमध्ये सलमान समुद्र सपाटीपासून 33,000 फूट उंचीवर असलेल्या विमानात दिसणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी सोशल मीडियावर चित्रपटाच्या निर्मितीबद्दलचे अपडेट शेअर केलं. या चित्रपटात रश्मिका मंदान्नाही मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान आणि साजिद नाडियादवाला यांनी संयुक्तपणे करत आहे.

या जोडीने यापूर्वी साजिद नाडियादवाला दिग्दर्शित 'किक' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाला प्रीतम संगीत देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. साजिदचा हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. 2025 च्या ईदला 'सिकंदर' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

एक दिवसापूर्वी सलमान खान म्हणाला होता की, जेव्हा तो बॉलीवूडवर एकतर्फी राज्य करत होता तेव्हा त्याला खूप गंभीर चित्रपटाची ऑफर आली होती. मात्र त्यानं हा चित्रपट नाकारला होता. पुढे हा चित्रपट प्रचंड गाजला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनी सलमान खाननं तो चित्रपट नाकारल्याबद्दल खंत व्यक्त केली. सलमान खान हा एक असा अभिनेता आहे की, त्याच्या स्टाईलचा संपूर्ण चित्रपटावर त्याचा स्वॅग हावी होतो.

'सिकंदर' चित्रपटाच्या लेटेस्ट अपडेटमध्ये अलिकडेच दक्षिणेकडील चित्रपटांची ब्यूटी रश्मिका मंदान्ना यात भूमिका करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता अभिनेता सत्यराजनमही सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे. साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'बाहुबली' या चित्रपटात सत्यराजनं कट्टप्पाची भूमिका साकारली होती. 'सिकंदर' या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सत्यराजच्या आधी 'सिकंदर' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता अरविंद स्वामी, प्रकाश राज आणि कार्तिकेय यांची नावं समोर आली होती. आता या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत कोण दिसणार आणि सलमान खानबरोबर कोण कोणते कलाकार चित्रपटात झळकणार याची प्रतीक्षा सलमान खानचे चाहते करत आहेत.

हेही वाचा -

  1. कामाच्या धबडग्यातून प्रियांका चोप्रानं काढला लेकीसाठी वेळ, केला व्हिडिओ शेअर - priyanka chopra share video
  2. बॉलिवूड अभिनेत्रींची पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील स्टाईल - 5 times Bollywood divas
  3. 'सिकंदर'साठी सलमान खान स्वत:च करणार अ‍ॅक्शन सीन्स, 'या' दिवसापासून सुरू होणार शूटिंग - Salman Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.