ETV Bharat / entertainment

Laapataa ladies : सलमान खाननं किरण रावचं 'लापता लेडीज'साठी केलं कौतुक - Laapataa ladies

Laapataa ladies : अभिनेता आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावने दिग्दर्शन केलेला 'लापता लेडीज' हा चित्रपट अनेकांना आवडत आहे. आता अभिनेता सलमान खाननं देखील किरणचं या चित्रपटासाठी कौतुक केलं आहे.

Laapataa ladies
लापता लेडीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 11:01 AM IST

मुंबई - Laapataa ladies : अभिनेता आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमधून किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगली प्रशंसा मिळत आहे. या चित्रपटाचे अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं असून किरणची अनोख्या कल्पना असलेला हा चित्रपट पाहून अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. अलीकडेच, बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननेही 'लापता लेडीज'बद्दल एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ''आत्ताच किरण रावचा 'लापता लेडीज' हा पाहिला. व्वा, किरण मला आणि माझ्या वडिलांना हा चित्रपट पाहून खूप छान वाटला. दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन, उत्तम काम. तू माझ्याबरोबर कधी काम करणार आहेस, किरण?'' असा किरणला सलमाननं प्रश्नही केला आहे.

'लापता लेडीज' चित्रपटाची स्टार कास्ट : किरण रावच्या 'लापता लेडीज' या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम, दुर्गेश कुमार, सतेंद्र सोनी आणि हेमंत सोनी यांच्याही विशेष भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. 'लापता लेडीज' चित्रपटाची कहाणी ग्रामीण विभागामधील असून एका तरुणच्या हरवलेल्या नववधूच्या शोध घेण्याभोवती फिरणारी कथा आहे. ही नववधू रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या पतीपासून विभक्त होते. पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करणारा रवी किशन जेव्हा या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी घेतो, तेव्हा या कहाणीला वेगळे वळण मिळते.

किरणला मिळाला आमिरचा पाठिंबा : 'लापता लेडीज' सप्टेंबर 2023 मध्ये टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये टीझर प्रदर्शित करण्यात आला होता, ज्याला इथे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले होते. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. 'लापता लेडीज' आता सध्या खूप चर्चेत आहे. किरण आणि आमिर यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र अनेकदा तो आपल्या पत्नीला मदत करताना दिसते. दरम्यान, सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आगामी 'द बुल ' किक 2', 'टायगर वर्सेस पठाण', 'दबंग 4' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. ऑस्कर-विजेती बिली इलिशचे 'व्हाट आय वाज मेड फॉर' गाणे श्रोत्यांच्या मनाला भिडले
  2. Katrina kaif latest Photo : कटरिना कैफच्या लेटेस्ट फोटोवर चाहत्यांनी केली कौतुकाचा वर्षाव
  3. पुलकित सम्राट पिवळ्या रंगाच्या पोशाखात लग्नाच्या ठिकाणी झाला रवाना ; व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.