ETV Bharat / entertainment

सलमान खान 'बिग बॉस ओटीटी 3'चं होस्टिंग चुकवण्याची शक्यता, करण जोहरसह काही स्टार्सची नावे आले समोर - salman khan - SALMAN KHAN

Bigg Boss OTT 3 Salman Khan : सलमान खान आता 'बिग बॉस ओटीटी 3'साठी चर्चेत आला आहे. यावेळी तो या शोचा भाग नसेल.

Bigg Boss OTT 3 Salman Khan
बिग बॉस ओटीटी 3 सलमान खान (Salman Khan Fan page Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 3:12 PM IST

मुंबई - Bigg Boss OTT 3 Salman Khan : हिंदी चित्रपटसृष्टीचा भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉसची ओटीटी आवृत्ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे. मात्र यावेळी 'भाईजान' हा शो होस्ट करताना दिसणार नाही. आता हा शो होस्ट करण्यासाठी बॉलिवूडचे तीन मोठे चेहरे पुढे येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान मोस्ट अवेटेड चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगमुळे 'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट करू शकणार नाही.

बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन : 'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट करण्यासाठी चित्रपट निर्माते करण जोहर, अनिल कपूर आणि संजय दत्त यांची नावे आता समोर आली आहेत. या तीन स्टार्समध्ये करण जोहर हा शो होस्ट करण्याची सर्वाधिक शक्यता आहे. 'बिग बॉस ओटीटी सीझन 1' करण जोहरनं होस्ट केला होता. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती. हा शो देखील प्रचंड लोकप्रिय झाला होता. यानंतर सलमान खाननं बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन होस्ट केला आणि नंतर वादग्रस्त यूट्यूबर एल्विश यादव हा शो जिंकला. बिग बॉसच्या इतिहासात वाइल्ड कार्ड एन्ट्रीनं बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर एल्विशच्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली.

वर्कफ्रंट : 'हिरामंडी' स्टार जेसन शाह, चंद्रिका दीक्षित, शेहजादा धामी, प्रतीक्षा ओर्युन्ये यांना 'बिग बॉस ओटीटी 3'चे स्पर्धक असू शकतात. सलमान खान 2025च्या ईदला त्याचा बहुप्रतीक्षित 'सिकंदर' चित्रपटाद्वारे धमाका करणार आहे. 'सिकंदर' हा चित्रपट 'गजनी' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक ए.आर. मुरुगोदास बनवत आहेत. सध्या या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 'सिकंदर' चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री त्रिशा कृष्णन, रश्मिका मंदाना, सोनाक्षी सिन्हा, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर आणि गोविंदा हे स्टार्स दिसणार आहेत. दरम्यान सलमानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'दबंग 4' आणि 'टायगर वर्सेस पठान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात घेतला 'या' साऊथ स्टार्सनं भाग - LOK SABHA ELECTIONS 2024
  2. 'शक्तिमान' मध्ये आदिनाथ कोठारे साकारणार 'सुपरहिरो'? - Adinath Kothare
  3. सारा अली खान आणि अमृता सिंग यांचा क्यूट इब्राहिम अली खानबरोबरचा फोटो व्हायरल, दिसली तैमूरची झलक - Sara Ali khan share pic

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.