ETV Bharat / entertainment

सलमान खानला मिळाली नवी धमकी, केली 5 कोटींची मागणी

सलमान खानला नवी धमकी मिळाली आहे. यामध्ये 5 कोटींची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था करू असं धमकवण्यात आलंय.

author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

salman khan
सलमान खान (सलमान खान - (PTI))

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या जीवाला सध्या मोठा धोका आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनं सलमानला जीवे मारण्याची शपथ घेतली आहे. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोई टोळीनं सलमान आणि शाहरुख खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता सलमान खानला आणखी एक नवी आणि लेटेस्ट धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांपर्यंत एक नवीन धमकीचा संदेश पोहोचला आहे. या धमकीमध्ये 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

सलमान खानला मिळाली नवीन धमकी : मिळालेल्या धमकीमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यात 5 कोटी रुपयांसाठी समेट होणार असल्याचं सांगण्यात आलंय. नव्या धमकीमध्ये लिहिलंय, 'ही धमकी हलक्यात घेऊ नका, सलमान खानला जिवंत रहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईबरोबर भांडण मिटवायचं आहे, तर 5 कोटी रुपये पाठवा. पैसे न पाठवल्यास सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल.' सलमान खानला नवी धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. आता अनेक चाहते देखील सलमानची चिंता करताना दिसत आहेत.

सलमान खान शूटिंगमध्ये व्यग्र : मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी खूप गंभीरपणे करत आहेत. 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी एका तरुणानं बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आतापर्यंत याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशचा धर्मराज राजेश कश्यप (19), हरियाणाचा गुरमेल बलजीत सिंग (23), हरीश कपूर बलकराम निषाद (23) आणि पुण्याचा प्रवीण लोणकर यांचा समावेश आहे. याशिवाय शूटर शिवकुमार गौतमसह तीन आरोपींविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान जीवाला धोका असताना देखील सलमान शूटिंग करत आहे. त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

हेही वाचा :

  1. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्या असतानाही, सलमान खान सुरू ठेवणार 'सिकंदर'चे शूटिंग?
  2. सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईमध्ये मांडवली करण्यासाठी पुढं आली सोमी अली, पाहा पोस्ट
  3. बाबा सिद्दिकी हत्याकांडानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.