ETV Bharat / entertainment

गणपती विसर्जन सोहळ्यात सलमान खाननं कुटुंबासह केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल - SALMAN KHAN - SALMAN KHAN

Salman khan Ganpati Visarjan : सलमान खाननं गणपती विसर्जन सोहळ्यात आपल्या कुटुंबाबरोबर खूप धमाल केली. आता त्याचा सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Salman khan Ganpati Visarjan
सलमान खान गणपती विसर्जन (सलमान खान (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 1:19 PM IST

मुंबई - Salman khan Ganpati Visarjan : बॉलिवूडमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यानिमित्तानं सलमान खानच्या घरी गणेश चतुर्थीची पूजा झाली. 'भाईजान'च्या घरी अनेक सेलिब्रिटींनी गणरायाचं दर्शन करण्यासाठी हजेरी लावली होती. दरम्यान सलमान खानच्या कुटुंबासह अनेक स्टार्सनी त्याची बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी बाप्पाचा आशीर्वाद घेतला. सलमाननं कुटुंब आणि सेलिब्रिटी पाहुण्यांबरोबर बाप्पाच्या नावाचा जयघोष करून डान्सही केला. बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यातील सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'भाईजान' आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबानं गणपती विसर्जनामध्ये जल्लोष केला.

बाप्पाचा विसर्जन सोहळा : सलमान खानची बहीण अर्पिता खान, आयुष शर्मा, अरबाज खान, अरहान, निर्वाण आणि अजीज यांनी देखील या सोहळ्यात खूप डान्स केला. आता त्याचे देखील सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सोहळ्यात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री संगीता बिजलानीही सहभागी झाली होती. याआधी अर्पिता आणि आयुषचे बाप्पाची स्थापना करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. सलमान खानचे वडील सलीम खान, सोहेल खान आणि युलिया वंतूर यांचे देखील बाप्पाचे दर्शन करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. सलमानकडे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.

'सिकंदर'चं शूटिंग : सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच सलमान खानला त्याच्या बरगड्यांचा त्रास झाला होता, तरीही त्यानं चित्रपटाचे शूट सुरू ठेवलं होतं. सलमान खानचा मोस्ट अवेटेड मास ॲक्शन चित्रपट 'सिकंदर' हा 2025मध्ये रुपेरी पडद्यावर ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानबरोबर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'सिकंदर' चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'गजनी' फेम एआर मुरुगादास करत आहेत. दरम्यान सलमानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'दंबग 4', 'पवन पुत्र भाईजान', 'इन्शाअल्लाह', 'नो एंट्री 2' आणि 'किक 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. दिग्दर्शक ॲटलीबरोबर सलमान खानच्या चित्रपटावर शिक्कामोर्तब? शूटिंगची तारीख आली समोर - action entertainer movie
  2. गणपतीच्या मूर्तींसाठी 'भाईजान'नं सांगितली महत्त्वाची गोष्ट, चाहत्यांना केलं आवाहन - Ganesh Chaturthi
  3. 'स्त्री 2'मधला 'सरकटा' सुनील कुमार होणार 'बिग बॉस 18'चा स्पर्धक - Stree 2 Sarkata

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.