मुंबई - Phantom Poster Used by Terrorists : जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी गटाने तयार केलेल्या प्रचाराच्या व्हिडिओबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी चेतावणी जारी केली आहे. या व्हिडिओमध्ये सैफ अली खानच्या फँटम चित्रपटाच्या पोस्टरचा समावेश आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, असा कंटेंट शेअर करणं किंवा फॉरवर्ड करणं बेकायदेशीर अॅक्टिव्हिटी (प्रतिबंध) कायदा (UAPA) च्या कलम 13 आणि 18 अंतर्गत बेकायदेशीर मानलं जातं. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "जैशने अभिनेता सैफ अली खानच्या 'फँटम' चित्रपटाच्या पोस्टरसह 5 मिनिटे 55 सेकंदांचा व्हिडिओ नुकताच 22 जुलै 2024 रोजी दुपारी 2 च्या सुमारास शत्रूने प्रसिद्ध केला आहे."
ALERT ‼️
— J&K Police (@JmuKmrPolice) July 22, 2024
A 5 minutes 55 seconds video by Jaish with a poster of the Bollywood movie Phantom with the photo of actor Saif Ali has just been released by the enemy around 2 PM today on 22 July 2024.
General public is alerted that they will do the following:
1.) first, they will…
त्यांनी लोकांना हा प्रचार व्हिडिओ प्रसारित करण्यापासून सावध केलं आणि त्यांना ते मिळाल्यास तपशील प्रदान देण्याचं आवाहन केलं. "सामान्य लोकांना सावध केलं जातं आहे की, त्यांनी पुढील गोष्टी कराव्यात : पहिली गोष्ट म्हणजे ते कोणत्याही प्रकारे, कोणालाही फॉरवर्ड करणार नाहीत. दुसरं म्हणजे, ते मेसेज देऊन कळवतील की त्यांना हा प्रचार व्हिडिओ कोणाकडून मिळाला आहे. दूरध्वनी क्रमांक आणि व्हिडिओ मिळाल्याची तारीख आणि वेळ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पर्यवेक्षी अधिकाऱ्याला कळवावी आणि नागरी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना मजकूर मेसेजच्या माध्यामातून कळवावा," असे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढं म्हटलं आहे.
"कोणत्याही परिस्थितीत हा व्हिडिओ फॉरवर्ड केला जाणार नाही. अशा स्वरूपाची सामग्री पोस्ट करणे आणि फॉरवर्ड करणे हा UAPA च्या कलम 13 आणि 18 अंतर्गत गुन्हा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.", असंही पोलिसांनी पुढं म्हटलंय.
या वर्षाच्या सुरुवातीला, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, बॉलिवूड सेलिब्रिटी आमिर खान आणि रणवीर सिंग यांनी राजकीय पक्षाचे समर्थन करताना हाताळलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोन्ही स्टार्सनी हे व्हिडीओ तयार करण्यात त्यांचा कोणताही सहभाग नाकारला आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, सैफ अली खान 'देवारा'मध्ये त्याच्या तेलुगू पदार्पणाची तयारी करत आहे, यामध्ये तो ज्युनियर एनटीआरच्या विरुद्ध मुख्य विरोधी भूमिकेत दिसणार आहे. त्याची पत्नी करीना कपूर खान, 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, आणि अर्जुन कपूर यांच्यासोबत दिसणार आहे, रोहित शेट्टी दिग्दर्शित, चित्रपटगृहांमध्ये दिवाळीला रिलीज करण्याचं नियोजन आहे.