ETV Bharat / entertainment

रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख यांचा मजेदार रिल व्हायरल, पाहा व्हिडिओ - Riteish Genelia Deshmukh - RITEISH GENELIA DESHMUKH

Riteish Genelia New Reel: रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी अलीकडेच एक मजेदार रील तयार केला आहे. आता या रिलमध्ये दोघेही आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे.

Riteish Genelia New Reel
रितेश जेनेलिया यांच नवीन रील ((Photo- @geneliad Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 2:08 PM IST

मुंबई - Riteish Genelia New Reel : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे फक्त चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर सोशल मीडियावरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा त्यांच्या मजेदार रिल्सनं चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत असतात. अलीकडेच या जोडप्यानं एक मजेदार रील बनवला आहे. आता या रिलवर चाहत्यांसह सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. जेनेलियानं तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा रिल शेअर केला आहे. रिलची सुरुवात रितेशपासून होते. यामध्ये तो 1997 च्या रोमँटिक-कॉम 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी' मधील जुही चावलाच्या 'अकेला है मिस्टर खिलाडी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख शेअर केला रिल : यानंतर या रिलमध्ये जेव्हा जेनेलिया येते, तेव्हा ती एका हुशार पत्नीची भूमिका करते. रितेशचे गाणे बीवी नंबर 1 मध्ये बदलते. तिच्या पतीला त्यावर रील बनवण्यास सांगते. हा रिल शेअर करत जेनेलियानं लिहिलं, "सामान्य नवरा रितेशबरोबर बीबी नंबर 1." 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस खिलाडी' अभिनेत्री जुही चावलानेही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं कमेंट विभागात हसणारा इमोजी पोस्ट केले आहेत. जुही व्यतिरिक्त हंसिका मोटवानी, मुश्ताक शेख आणि जय भानुशाली या कलाकारांनी पोस्टवर सुंदर अशा कमेंट्स केल्या आहेत. रितेशचा हा रिल अनेकांना आवडत आहेत.

चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव : या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "रितेश आणि जेनेलिया या दोघांची जोडी हिट आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "तुम्ही नंबर 1 आहात. रितेश सर देखील नंबर 1 पती आहात. तुम्ही दोघेही नंबर 1 जोडपे आहात." आणखी एकानं लिहिलं, "जेनेलिया तर कोहिनूर आहे. तिच्यासारखी अभिनेत्री चित्रपटसृष्टीत नाही" याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून या जोडप्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. रितेश आणि जेनेलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'राजा शिवाजी', 'हाऊसफुल 5', 'मस्ती 4', 'विसफोट' आणि 'रेड 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे जेनेलिया ही 'ज्युनिअर' या कन्नड चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यननं 'चंदू चैंपियन'मधील ट्रेलर डबिंगची झलक केली शेअर - Chandu Champion
  2. करण जोहर निर्मित, वरुण धवन स्टारर चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'चं शूटिंग सुरू - sanskari ki tulsi kumari Movie
  3. कोविड लशीचा खरेच दुष्परिणाम होतोय का? श्रेयस तळपदेनं सांगितला अनुभव - Shreyas Talpade

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.