मुंबई - Marathi bigg boss : हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला, हे अनेकांना माहित आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवीन सीझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र या नवीन सीझनची वाट खूप आतुरतेनं पाहात आहे. दरम्यान यावेळी 'बिग बॉस मराठी'चं होस्टिंग बॅालिवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. हा शो कलर्स मराठी आणि जीओ सिनेमावर प्रसारित होणार आहे. आता कलर्स मराठी आणि जीओ सिनेमानं त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'चा प्रोमो शेअर केला आहे.
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन येणार लवकरच : प्रोमोत बिग बॉसचा डोळा आणि रितेश देशमुख दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवीन सीझन खूप धमाकेदार असणार आहे. या सीझनमध्ये एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा पाचवा नवीन सीझन सध्या खूप चर्चेत आहे. या शोचे पहिले चार सीझन मराठी प्रेक्षकांना खूप आवडले होते. आता या शोमध्ये कुठले स्टार्स सहभागी होणार याबद्दल काही अपडेट आलेली नाही. बिग बॅासचं घर पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहे. आता या शोमध्ये कुठले स्पर्धक दिसणार याबद्दल सर्वांनाचं उत्सुकता आहे. 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सीझनची जोरात तयारी सुरू झाली आहे.
रितेश देशमुखचं वर्कफ्रंट : बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल हे काही दिवसात कळेल. याआधी या शोचं होस्टिंग महेश मांजरेकर यांनी केलं होत. आता रितेश या शोमध्ये प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसणार आहे. दरम्यान व्हायरल होत असलेल्या प्रोमोवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. अनेकजण रितेशला नवीन अवतारात पाहण्यासाठी कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत. रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'हाऊसफुल 5'मध्ये अक्षय कुमारबरोबर दिसणार आहे. याशिवाय तो 'रेड 2', 'मस्ती 4', 'विस्फोट' आणि 'राजा शिवाजी' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
हेही वाचा :