मुंबई- Met Gala 2024 : मेट गाला 2024 लवकरच सुरू होणार आहे. न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट कॉस्च्युम इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी आयोजित केलेला हा चॅरिटेबल फॅशन शो आहे. या फॅशन शोमध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री सहभागी होतात. दरवर्षी दीपिका पदुकोणपासून ते प्रियांका चोप्रापर्यंतचे काही बॉलिवूडमधील कलाकार या शोमध्ये हजेरी लावतात. मेट गाला हा शो दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. यावेळी कॉस्च्युम इन्स्टिट्यूट बेनिफिट (Met Gala ) सोमवार, 6 मे रोजी हा कार्यक्रम आयोजित करत आहे. या कार्यक्रमात दरवर्षी वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतील लोक रेड कार्पेटवर विचित्र वेशभूषेत दिसतात.
मेट गाला 2024मध्ये 'हे' हॉलिवूड कलाकार राहणार हजर : यावेळी या कार्यक्रमात अमेरिकन गायिका रिहाना, सुपरमॉडेल केंडल जेनर, आणि लिली ग्लॅडस्टोन हे कलाकार उपस्थित राहणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात सुपरमॉडल गिसेले बुंडचेननं जिउ-जित्सू प्रशिक्षक जोआकिम वैलेंटेबरोबर हजेरी लावू शकते. बंडचेननं यापूर्वी अनेकदा या कार्यक्रमात पूर्वश्रमीचा पती टॉम ब्रॅडीसह भाग घेतला आहे. तसेच ऑलिव्हिया रॉड्रिगो, अस्वल स्टार अयो अडेबिरी, उमा थर्मन, सारा पॉलसन हे कलाकार देखील उपस्थित राहू शकतात. मात्र बॉलिवूडमधील कोणते स्टार्स या शोमध्ये सहभागी होणार आहेत, याची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मेट गालाची थीम : दरवर्षी दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या सोहळ्याचा भाग बनतात, मात्र यावेळी गर्भधारणेमुळे दीपिका या सोहळ्याचा भाग होऊ शकणार नाही. याबद्दल दीपिकाच्या बाजूनं अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. यंदा मेट गालाची थीम 'द गार्डन ऑफ टाईम' अशी ठेवण्यात आली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्स रेड कार्पेटवर हजेरी लावून या कार्यक्रमाला आणखी भव्य बनवतात. याशिवाय या कार्यक्रमात स्टार्सची विचित्र फॅशन पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. आता लवकरच बॉलिवूडमधून या कार्यक्रमामध्ये कोण उपस्थित राहणार याबद्दल माहिती समोर येईल.
हेही वाचा :
- सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan
- अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan
- 'बेबी जॉन' ऐवजी, 'कल्कि 2898 एडी' होऊ शकतो रिलीज, जाणून घ्या कारण... - Baby John Postponed