ETV Bharat / entertainment

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी ग्लोबल सिंगर रिहानाची टीम भारतात - अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

Rihanna : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी ग्लोबल सिंगर रिहानाची टीम आज 28 फेब्रुवारीला भारतात पोहोचली आहे. याशिवाय दुसरीकडे अनंत अंबानीचे जामनगर गावातील महिलांनी जोरदार स्वागत केलं आहे.

Rihanna
रिहाना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 4:38 PM IST

मुंबई - Rihanna : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आता धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाच्या तयारीत आहे. अनंत अंबानीनं गेल्या वर्षी राधिका मर्चंटशी साखरपूडा केला होता आणि आता हे जोडपे मार्चमध्ये जामनगर (गुजरात) येथे सात फेरे घेणार आहेत. अनंत आणि राधिका यांच्या विवाहपूर्व विधीचे 1 ते 3 मार्च दरम्यान अनेक कार्यक्रम असणार आहेत. आता यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स जामनगरला रवाना होत आहेत. दरम्यान यानिमित्तानं बार्बाडोसची जागतिक स्टार गायिका रिहानाची टीम आज 28 फेब्रुवारीला जामनगर येथे पोहोचली आहे.

रिहानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रिहाना विमातळावरून बाहेर पडताना दिसत आहे. याशिवाय आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात जामनगर गावातील महिला अनंत अंबानीचे स्वागत करताना दिसत आहेत. या तीन दिवसीय विवाह सोहळ्यात 2500 हून अधिक पदार्थ जेवणात असणार आहेत. अनंत आणि राधिकाचे लग्न चालू वर्षाच्या जुलै महिन्यात होणार आहे. आता पुन्हा एकदा लग्नात हिंदी चित्रपटसृष्टीत सर्व स्टार्स एकाच छताखाली दिसणार आहेत. अनंत अंबानीचं लग्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'वेड इन इंडिया'नं प्रेरित आहे. मन की बात' रेडिओ संबोधनात, पंतप्रधान म्हटलं होत की, परदेशात लग्न करण्याऐवजी देशात लग्न केले पाहिजे. त्यानंतर अनेकजण मायदेशी लग्न करताना दिसत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात हे कलाकार लावणार हजेरी : अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार यांच्यासह अनेक स्टार्स या हायप्रोफाईल लग्नाला हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर अनंत-राधिकाच्या लग्नात परदेशी सेलिब्रिटीही पाहुणे म्हणून दिसणार आहेत. यामध्ये बिल गेट्स आणि फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या नावाचाही समावेश आहे. आधी देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याबद्दल खूप चर्चा झाली होती. आता लग्नाबद्दल देखील सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे आणि अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. अनंत अंबानीचं लग्न खूप भव्य असणार आहे.

हेही वाचा :

  1. पोलिसांच्या गणवेशात रजनीकांतची स्टायलिश एन्ट्री, 'वेट्टयान'च्या सेटवरील व्हिडिओ व्हायरल
  2. साऊथ अभिनेत्री सौम्या जानूचा ट्रॅफिक होमगार्डवर हल्ला, रस्त्यातील राड्याचा व्हिडिओ व्हायरल
  3. आउटसाइडरला बॉलिवूडमध्ये कशी वागणूक दिली जाते याचा शाहिद कपूरनं केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.