ETV Bharat / entertainment

रिचा चड्ढाने पती अली फजलसह केली प्रेग्नंन्सीची घोषणा, सेलेब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव - रिचा चड्ढा

हिंदी चित्रपट आणि ओटीटी मनोरंजन जगतातील लोकप्रिय जोडपे अली फजल आणि रिचा चड्ढा आई वडील होणार आहेत. या जोडप्याने आज 9 फेब्रुवारी रोजी प्रेग्नंन्सीची घोषणा केली आहे.

Richa Chadha announces pregnancy
रिचा चड्ढा आणि अली फजल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 1:05 PM IST

मुंबई - मनोरंजन जगतातून एकामागून एक गुड न्यूज येत आहेत. 8 फेब्रुवारी रोजी, बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतमने तिच्या आगामी चित्रपट 'आर्टिकल 370' च्या ट्रेलर लाँचच्या वेळी तिचा पती आदित्य धरसह तिच्या गरोदरपणाची घोषणा करून चाहत्यांना एक मोठी भेट दिली. आज 9 फेब्रुवारीला मनोरंजन जगतातून पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. आता बॉलिवूडची 'भोली पंजाबन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रिचा चढ्ढा आई होणार आहे. अभिनेत्री रिचा चड्ढाने तिचा स्टार पती अली फजलसह आज 9 फेब्रुवारीला चॉकलेट डेच्या दिवशी तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. या जोडप्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे की ते आई-वडील होणार आहेत.

रिचा चढ्ढा आणि अलीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टमधून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या गुड न्यूजसोबत दोघांनी एक फोटोही शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करून लिहिली आहे की, 'आमच्या जगात एक लहान पाहुणा येत आहे'.

चाहते आणि सेलिब्रिटींनी केले रिचा आणि अली फजलचे अभिनंदन - या गुड न्यूज पोस्टसह अली आणि रिचा चढ्ढा यांनी स्वतःचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये हे जोडपे एकमेकांकडे बघताना दिसत आहेत. आता या गुड न्यूजबद्दल चाहते आणि सेलिब्रिटी या छान जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर, दिया मिर्झा, आयुष्मान खुराना, हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद, अभिनेता राजकुमार रावची स्टार पत्नी पत्रलेखा, टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना, ईशा तलवार, एलनाज यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या आनंदाच्या बातमीबद्दल या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

रिचा चड्ढा आणि अली फजल या जोडप्याने 2022 मध्ये अत्यंत शाही पद्धतीने दिल्लीत हिंदू आणि मुस्लिम दोन्ही रितीरिवाजानुसार लग्न केले. रिचा चढ्ढा अलीशी 'फुक्रे' चित्रपटात भेटली होती आणि तिथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. या चित्रपटानंतर फुक्रे, फुक्रे 2 आणि फुक्रे 3 आले. फुक्रे 3 रिलीज होण्यापूर्वी दोघांनी लग्न केले.

हेही वाचा -

  1. तेरी बातों में ऐसा उल्झा जिया : व्हॅलेंटाईन डे साठी परफेक्ट पिक्चर म्हणत प्रेक्षकांनी केले शाहिद-क्रितीच्या रोम कॉमचे कौतुक
  2. रजनीकांतचा 'मोइनुद्दीन भाई' पसंतीस उतरला, प्रेक्षकांनी केला 'लाल सलाम'
  3. 'तेरी बातों में...' च्या स्क्रिनिंगमध्ये नव्या गर्लफ्रेंडसोबत दिसला इशान खट्टर, एक्स जान्हवी कपूरही होती हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.