ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाआधी थरारक 'काकुडा'ची रिलीज तारीख जाहीर - Kakuda Release Date - KAKUDA RELEASE DATE

Sonakshi Sinha Kakuda Release Date OUT: सोनाक्षी सिन्हा 23 जूनला लग्नांच्या बेडीत अडकणार आहे. त्याआधी तिचा नवीन चित्रपट 'काकुडा' ची रिलीज डेट समोर आली आहे. जाणून घ्या सोनाक्षी सिन्हाचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल?

Release date of thriller Kakuda
'काकुडा'ची रिलीज तारीख जाहीर ((IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 2:55 PM IST

मुंबई - Sonakshi Sinha Kakuda Release Date OUT: बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा 23 जूनला तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करणार आहे. काल रात्री सोनाक्षी आणि झहीरच्या कुटुंबानं एकत्र जेवण केलं. सोनाक्षी आणि झहीरचे लग्न मोठ्या थाटात पार पडणार आहे. दरम्यान, सोनाक्षी सिन्हाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. सोनाक्षीच्या लग्नाच्या दोन दिवस आधी तिच्या 'काकुडा' या नव्या थ्रिलर ड्रामा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

'काकुडा' या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि साकिब सलीम यांच्याबरोबर स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं. अलिकडेच आदित्य यांनी दिग्दर्शित केलेला 'मुंज्या' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटानं 70 कोटींची कमाई केली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांचा 'काकुडा' हा नवा थ्रिलर चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

'काकुडा' चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत बोलायचे तर, हा चित्रपटगृहांमध्ये नाही तर 12 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. आज 21 जून रोजी निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज तारखेसह एक आकर्षक पोस्टर जारी केलं आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा बरोबर रितेश आणि साकिब देखील दिसत आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, "पुरुषांच्या हितार्थ रिलीज झाला आहे, काकुडा 12 जुलैला येत आहे, त्यामुळे घरीच रहा आणि 7.15 वाजता दार उघडे ठेवण्यास विसरू नका".

'काकुडा'चे कथानक आहे भीतीदायक

'काकुडा' चित्रपटाची निर्मिती आरएसव्हीपीने केली आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालम तर, हा चित्रपट उत्तर प्रदेशातील मेरठ या प्रसिद्ध जिल्ह्यातील रातोरी नावाच्या गावात घडतो. या गावात एक जुना शाप आहे, या गावातील प्रत्येक घराला दोन समान दिसणारे दरवाजे आहेत, एक सामान्य आणि दुसरा थोडेसा छोटा. दर मंगळवारी संध्याकाळी 7.15 वाजता छोटा दरवाजा उघडा ठेवावा. जर हा दरवाजा उघडा ठेवला नाही तर तो 'काकुडा'च्या तावडीत अडकेल, पण काकुडा फक्त पुरुषांवरच का हल्ला करतो, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

हेही वाचा -

  1. बॉलिवूड स्टार्सना लागलं योगासनांचं वेड, सौंदर्यवतींनी शेअर केले योग करतानाचे फोटो - International Yoga Day 2024
  2. 'भिडू... योग करने का, मस्त रहने का' प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुंबईकरांना संदेश - World Yoga Day
  3. "हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले" या पंक्तींप्रमाणे आज आपल्या हृदयाची अवस्था..; ज्येष्ठ गायक हृदयनाथ मंगेशकर - Shivacharitra Ek Soneri Paan song

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.