ETV Bharat / entertainment

'ॲनिमल'मधील 'जमाल कुडू' गाण्यावर बॉबी देओलची स्टेप 32 वर्षांपूर्वी करण्यात आली, पाहा कोणी केली - rekha dance - REKHA DANCE

Jamal Kudu Dance : 'जमाल कुडू' गाण्यावरची स्टेप 32 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. आता ही स्टेप कोणी केली याबद्दल जाणून घ्या...

Jamal Kudu Dance
जमाल कुडू डान्स ((डिजाइन फोटो- @T-Series यूट्यूब/@krishna4948 इंस्टाग्राम))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 4:02 PM IST

मुंबई - Rekha Jamal Kudu Dance : दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल' या चित्रपटानं गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट झाला होता. याशिवाय बॉबीचं 'जमाल कुडू' हे गाणं देखील खूप हिट झालं होतं. दरम्यान सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रेखा तिच्या 1988 मध्ये आलेल्या 'बीवी है तो ऐसी' मधील 'जमाल कुडू' मधील 'बॉबी' गाण्यावरची डान्स स्टेप करताना दिसत आहे. आता रेखावर अनेकजण कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

'जमाल कुडू'ची सिग्नेचर स्टेप : हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, बॉबी देओलची 'जमाल कुडू' सिग्नेचर स्टेप 32 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. रेखानं 1988 मध्ये आलेल्या 'बीवी है तो ऐसी' या चित्रपटातील 'सासू जी तूने मेरी कदर ना जानी' या गाण्यात पहिल्यांदा या डान्स स्टेपचा वापर केला होता. क्लिपमध्ये रेखा डोक्यावर ग्लास घेऊन नाचताना दिसत होती. दरम्यान बॉबीनं या स्पेपला आधुनिक टच दिला​ आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, "कदाचित सोशल मीडिया त्यावेळी एवढा सक्रिय नव्हता, त्यामुळे ही स्टेप व्हायरल झाली नाही."

वर्कफ्रंट : दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं आहे की," बॉबीनं कॉपी केली आहे.' आणखी एकानं लिहिलं 'यालाच म्हणतात जुनं ते सोने." दरम्यान अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. रेखाचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर रेखा आणि बॉबीची तुलाना करताना दिसत आहे. दरम्यान 'ॲनिमल' चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. या चित्रपटानं प्रचंड कमाई केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील येणार आहे. दरम्यान बॉबी देओलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'कांगुवा'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. करण जोहर निर्मित, वरुण धवन स्टारर चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'चं शूटिंग सुरू - sanskari ki tulsi kumari Movie
  2. कोविड लशीचा खरेच दुष्परिणाम होतोय का? श्रेयस तळपदेनं सांगितला अनुभव - Shreyas Talpade
  3. वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपटाचं शूटिंग सुरू - Sunny Sanskari Ki Tulsi Kumari

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.